एमएनएस बँकेला चांगल्या कार्यातून महाराष्ट्रात सर्वोच्च क्रमांकावर घेऊन जाण्याचे काम आपण एकजूटीने करू - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 एमएनएस बँकेला चांगल्या कार्यातून महाराष्ट्रात सर्वोच्च क्रमांकावर घेऊन जाण्याचे काम आपण एकजूटीने करू - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर-महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासाबरोबरच बचत गटांच्या महिलांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम आपण गेल्या अनेक वर्षापासून करीत आहोत. बँकेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत, अपंगांना साहित्यांचे वाटप, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणे अशा अनेक उपक्रमांतून सर्वसामान्य घटकातील नागरिकांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. यापुढील कालावधीतही सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी एकविचाराने काम करून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या चांगल्या कार्यातून महाराष्ट्रात सर्वोच्च क्रमांकावर घेऊन जाण्याचा संकल्प आपण एकजूटीने करू असे प्रतिपादन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज एमआयडीसी लातूरच्या सभागृहात  आयोजित महाराष्ट्र नागरी बॅँकेच्यावतीने संकल्प निर्धार मेळाव्याच्या उद्घाटन प्रंसगी बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा एमएनएस बँकेच्या संचालिका सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, बँकेचे तज्ज्ञ संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, सल्‍लागार संचालक निळकंठराव पवार, कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, बँकेचे जनरल मॅनेजर गहिरवार, जेएसपीएमचे एचआर डायरेक्टर राहुल आठवले, प्राचार्य गोविंद शिंदे, बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचे मॅनेजर प्रविण जाधव, शिरूर अनंतपाळ शाखेचे मॅनेजर शिवाजी सूर्यवंशी, विवेकानंद शाखेचे मॅनेजर दत्ता पाटील, अहमदपूर शाखेचे मॅनेजर गणेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, महाराष्ट्र नागरी बँकेच्या कार्यकाळात अशा अनेक महत्त्वपूर्ण बैठका झालेल्या आहेत. या माध्यमातून बँकेच्या अधिकारी कर्मचारी व संचालक मंडळांनी बँकेच्या प्रगतीची माहिती देण्याचे काम केलेले आहे. डिपॉझिटच्या संदर्भात वाढत्या व्याजदरामध्ये अडचणी येत असल्या तरी सर्वाधिक  व्याजदर भारतात आहेत. अमेरिकेत 0.1 टक्के व्याजदर आहे तर राष्ट्रीयकृत बँकाचा दर 6.5 टक्के आहे. अशा स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या बँकेला प्रगतीच्या शिखरावर पोहचविण्यासाठी ग्राहकांना केंद्रबिंदू मानून बँकेची वाटचाल करावी. सध्या बँकेचे कार्यकारी संचालक मोहिते हे अभ्यासपूर्ण चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत. त्यांच्यासोबत काही अधिकारी, कर्मचारी अत्यंत चांगले कार्य करीत आहेत. एकंदर कर्मचार्‍यांच्या, ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन बँकेमध्ये मोबाईल बँकींग, रोबोटेक आदी सुविधेसह चौफेर विकास करण्याचे काम आपण यापुढील कालावधीत करू, बँकेचे कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी व नवीन शाखा मोठ्या शहरामध्ये काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, या चांगल्या कामातून बँकेचा नावलौकिक वाढविण्याचे काम करू. राष्ट्रसंत मोरारी बापू म्हणतात की, खरा संत भगवे कपडे घातल्यामुळे होत नाही तर ज्याचे आचार, उच्चार विचार, अंगतविहार आणि आहार चांगले असतील तो खरा साधू ठरतो हे लक्षात घेऊन तोच पायंडा बँकेच्या अधिकारी कर्मचार्‍यांबाबतही लागू करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सत्कार बँकेच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, जनरल मॅनेजर गहिरवार, मार्केट यार्ड शाखेचे मॅनेजर प्रविण जाधव, शिरूर अनंतपाळ शाखेचे मॅनेजर शिवाजी सूर्यवंशी, अहमदपूर शाखेचे मॅनेजर गणेश पवार, विवेकानंद शाखेचे मॅनेजर दत्ता पाटील, सहाय्यक मॅनेजर श्रीनिवास भांबरे, पवार, सुशील भेटे, शिवपूजे, गुटे, नितीन सराफ, योगिता गायकवाड, साधना पोतदार, धनंजय तांदळे, इंगळे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी मानले.

बँकेच्या हितात आपली प्रगती समजून कार्य करावे - सौ.प्रतिभाताई पाटील  कव्हेकर
बँकेच्या अध्यक्ष व संचालकांचा संबंध एमडी आणि मॅरेजर यांच्याशी येतो पंरतु बँकेला पुढे घऊन जाण्यासाठी बँकेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी संवाद घडवून आणणे गरजेचे आहे. ही बाबत लक्षात घेऊन एमडी यांनी एमएनएस बँकेचा संकल्प निर्धार मेळावा आयोजित केला आहे. आपण ज्या संस्थेत काम करतो ती संस्था कशी मोठी करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. पदवीपेक्षा प्रामाणिकपणे काम केल्यास संस्थेला आणि नेतृत्वालाही काही कमी पडणार नाही. त्यामुळे कार्यक्षेत्र व्यापक असलेल्या एमएनएस बँकेला जपण्याचे काम करा तुमची प्रगती आपोआप होईल. असे आवाहन एमएनएस बँकेच्या संचालिका सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

बँकेची टॉप मॅनेजमेंट संस्कृती बदलण्याची गरज - अजितसिंह पाटील कव्हेकर
गेल्या 26 पर्वापासून बँकेचे काम चांगल्या पध्दतीने सुरू आहे. परंतु बँकेतील किरकोळ गोष्टीसाठी बँकेचे मॅनेजर व असिस्टंट मॅनेजर यांना जबाबदार धरण्याचे काम केले जात आहे. ही पध्दत चुकीची आहे. प्रत्येक व्यक्‍ती, कर्मचारी व अधिकार्‍यांने जबाबदारीने काम केल्यानंतर या अडचणी येणार नाहीत. दरवर्षी वार्षिक बैठकीच्या वेळेस सेम प्रंझेंटेशन होते त्यामध्ये बदल करून नाविण्य दाखविण्याचे गरज असते. पंरतु ते काम होत असताना दिसून येत नाही.  जागतिक मंदीमुळे 2009 मध्ये काही कालावधीत बँका अडचणीत होती. त्या अडचणी दूर करण्याचे काम साहेबांनी केले. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर नेतृत्वाने लक्ष घालण्यापेक्षा अधिकारी कर्मचार्‍यांनी आपल्या दिलेल्या पदाची सोने करून बँकेची प्रगती साधावी या प्रगतीसाठी बँकेची टॉप मॅनेजमेंट संस्कृती बदलण्याची गरज आहे असे प्रतिपादन एमएनएस बँकेचे तज्ज्ञ संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने