विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे पर्यावरण दिना निमित्ताने वृक्षारोपण.

 विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे पर्यावरण दिना निमित्ताने वृक्षारोपण.



विकासनगर :-- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कारखाना परिसरात मांजरा कारखाना व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने  वृक्षारोपण करण्यात आले.

सर्व जगभरात विविध कारणांमुळे पर्यावरण दुषित होत असून वेळीच याकडे लक्ष नाही दिले तर प्रचंड नुकसानीला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे.ही बाब लक्षात घेऊन माजी मंत्री तथा चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री अमित विलासरावजी देशमुख साहेब, आ.धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांनी सातत्याने कारखाना परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

 ५ जून जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने मांजरा साखर कारखाना येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय लातूरचे उपप्रादेशिक अधिकारी श्री कांबळे साहेब व क्षेत्रीय अधिकारी श्री क्षीरसागर साहेब तसेच कार्यकारी संचालक श्री पंडित देसाई व कारखाना खाते प्रमुख आणि कारखाना कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने