शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्डाचा ८८.८८ निकाल

शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्डाचा ८८.८८ निकाल
औसा/प्रतिनिधी - शिवाजी माध्यमिक विद्यालय औसा या विद्यालयाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल ८८.८८ टक्के इतका लागला असून विद्यालयातून प्रथम कु.ढोक सृष्टी नंदकुमार ८५.४०, द्वितीय कु.जमदाडे दिक्षा हाणमंत ८२.८० व तृतीय कु.कुंभार विजय गोविंद ७९.८० गुणानुक्रमे या तीन मुली प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने यश मिळवले आहे. विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विशेष प्राविण्यात ०६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १० विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ८८.८८ % निकाल विद्यालयाने दिला आहे . यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष तानाजी जगताप , सचिव नामदेव पवार व संस्थेच्या सर्व संचालक मंडळानी, मुख्याध्यापक रमेश मलवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने