भरधाव वेगाच्या दुचाकी स्वाराने धडक देवून पादच्यार्याचे पाय मोडले

 भरधाव वेगाच्या दुचाकी स्वाराने धडक देवून पादच्यार्याचे पाय मोडले

एस ए काझी
औसा /प्रतिनिधी : - आपल्या ताब्यातील भरधाव व निष्काळजीपणाने दुचाकी वाहन चालवून पादचाऱ्यास धडक देवून गंभीर जखमी करत पाय मोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकी स्वाराच्या विरोधात  औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 14 मे रोजी सायंकाळी 06 : 30  वाजता अलका रेसिडेन्सी, निलंगा रोड, मुक्ता पेट्रोल पंपाच्या समोर मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गेला असता, त्याचवेळी  लातूर - निलंगा रोडच्या पूर्वेकडील, बाजूस मोहन बाजीराव पाटील यांच्या जागेसमोर सय्यद हबीब खुर्शिद (वय, 48 वर्षे, रा.शफा नगर औसा)  मुस्ताक अहमद शेख हे थांबले असताना लातूरकडून निलंगा दिशेने लाल रंगाची बजाज पल्सर मोटरसायकल क्र.(एमएच -24 /वाय -७५०४) भरधाव वेगात व निष्काळजी पणाने चालवून सदर दुचाकी स्वाराने पादचारी नामे सय्यद हबीब खुर्शिद यांना जोरास धडक दिल्याने गंभीर जखमी झाला व त्यांच्या  डाव्या पायास मार लागून पायाचे हाड मोडले असता. त्यांना औसा येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून उर्वरित उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सदरील अपघातामध्ये भरधाव वाहनाने निष्काळजीपणाने वाहन चालवून सय्यद हबीब खुर्शिद यास गंभीररित्या जखमी केलेल्या दुचाकीस्वार नागनाथ पत्रिके (रा. माकणी ता. लोहारा) यांच्या विरोधात फिर्यादी सय्यद हबीब खुर्शिद याच्या तक्रारी अर्जावरून दि.  09 जून रोजी गुरनं 0249/2023  भादंवि 1860 अन्वये पोलिस अधिनियमाखाली 279, 337, 338, व महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 अंतर्गत 184 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास औसा पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने