रामनाथ विद्यालयात योगा दिन उत्साहात साजरा

रामनाथ विद्यालयात योगा दिन उत्साहात साजरा
आलमला. श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला तालुका औसा येथे दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सात वाजता योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम योगा प्रशिक्षक श्री रंगनाथ अंबुलगे यांनी विद्यार्थ्यांना योगाप्रणाम याचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक दाखवून सर्व मुलाकडून योगा करून घेतला आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये योगा किती महत्त्वाचा आहे .याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने