रुपमाता उद्योग समुहाच्या उपक्रमांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले कौतुक


रुपमाता उद्योग समुहाच्या उपक्रमांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले कौतुक

धाराशिव-
रुपामाता उद्योग समुहाचे प्रमुख अ‍ॅड.व्यंकटराव गुंड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पाडोळी ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र कापसे यांची उपस्थिती होती.

रूपामाता उद्योग समुहाच्या माध्यमातून अ‍ॅड. व्यंकटराव गुंड यांनी कृषी क्षेत्रात गुळ पावडर निर्मिती आणि दुग्ध व्यवसाय उद्योगात मोठी क्रांती केली आहे. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना रूपामाता समुहामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर बँकिंग आणि शैक्षणिक संस्थांमधून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.
रूपामाता परिवारातील व्यावसायिक प्रगतीची माहिती अ‍ॅड.व्यंकटराव गुंड यांनी पोलीस अधीक्षकांना दिली. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये नाव रुपाला आलेल्या रुपामाता परिवाराच्या वतीने दैनंदिनी नोंद डायरी यावेळी पोलीस अधीक्षकांना भेट देण्यात आली. रूपामाता समूहाच्या कृषिकेंद्रित उद्योग आणि उपक्रमांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी यांनी कौतुक केेले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने