युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदवसानिमित्तरूग्णांना फळे वाटप

युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदवसानिमित्तरूग्णांना फळे वाटप 
औसा /प्रतिनिधी-युवा सेनेची बुलंद तोफ युवासेना प्रमुख माननीय आमदार आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औसा युवासेनेच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
कोरोणा काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेक रुग्णांना मदत करुन सहकार्य केलेले तर आहेच. शिवाय शिवसेनेचा एक गट फुटून त्यांनी शिवसेने सोबत गदारी केली असतांनाच शिवसेनेवर ज्या वेळी वाईट वेळ आली तेव्हा तलवारीच्या पातीसारखे उभे राहून फुटीर गटाला आस्मान दाखवणारे आणि त्यांना सळो की पळो करून सोडणारे आमदार आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औसा युवासेनेच्या वतीने औसा येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी तारीख १३ रोजी येथील रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.
    यावेळी युवासेना जिल्हाचिटणीस बाळासाहेब नरवडे, तालुकाप्रमुख महेश सगर, उपतालुकाप्रमुख वैभव लंगर, शहरप्रमुख आकाश माने, उपशहरप्रमुख अमोल मोरे ,पवन इरपे, अमोल सुर्यवंशी, सुमित कोद्रे, पवन भुरे, ओंकार अपसिंगेकर, ऋषिकेश सुर्यवंशी, रोहित सिधवाडकर, प्रसाद जाधव इत्यादीजन यावेळी शिवसेनेचे व युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने