शहरातील २ कोटी ७० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन

शहरातील २ कोटी ७० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन
औसा - औसा शहराच्या विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जिल्हा नियोजन योजनेंतर्गत २ कोटी ७० लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन (दि.१२) रोजी करण्यात आले.औसा शहरातील विकासकामांसाठी विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सोमवारी सदरील २ कोटी ७० लक्ष रुपयांच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

              लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सदरील कामासंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी निधीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत औसा शहरातील प्रभाग क्रमांक २ व ३ मध्ये सिमेंट रोड, नाली व डांबरी रोड विकासासाठी २ कोटी ७० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. या कामाचे उद्घाटन सोमवारी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, नगरपरिषदेचे माजी गटनेते सुनील उटगे, कंटिअप्पा मुळे व शहरध्यक्ष लहू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संजय माळी, धनराज परसने, पप्पूभाई शेख, अच्युत पाटील, नितिन शिंदे, विकास कटके, जगदीश चव्हाण, मकरंद रामपुरे, पंत बिराजदार, बाळू ढोले, परवेझ काजी, नगरपरिषदेचे अभियंता गायकवाड, लक्ष्मण सोमवंशी आदीसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने