देशात एक नंबर आलेल्या लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याच्या प्रश्नासाठी भाजपा युवा मोर्चाची तीव्र निदर्शने.

 देशात एक नंबर आलेल्या लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याच्या प्रश्नासाठी भाजपा युवा मोर्चाची तीव्र निदर्शने. 

जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर – दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावा अन्यथा जनआक्रोश मोर्चा होईल...

लातूर: लातूर शहर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भाजपाच्या कार्यकाळात देशात एक नंबरवर आलेली होती. परंतु त्यानंतर मात्र कॉंग्रेसची सत्ता येताच स्वच्छ आणि सुंदर लातूरचे पुन्हा तीन तेरा झाले असल्याचे समोर आलेले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्याची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असतानाही लातूर महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आलेले आहे. लातूरचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री आमदार अमित देशमुख यांना लातूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. परिणामी नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड घोषणाबाजी करून लातूर महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. तसेच मनपा उपायुक्तांना निवेदन देऊन दोन दिवसात स्वछतेच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्या अन्यथा लातूर महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा ईशाराही भाजपा युवा मोर्चाच्यावतीने देण्यात आला. 
 भाजपच्या कार्यकालामध्ये लातूर महानगरपालिका देशात स्वच्छ व सुंदर सर्वेक्षणमध्ये पहिली आली होती. परंतु नंतर मात्र जनतेच्या नळपट्टी घरपट्टी मधून स्वच्छता कर्मचार्‍यांचे वेतन होत असतानाही लातूरच्या स्वछतेबाबत मात्र म्हणावे तसे नियोजन झालेले नाही. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे देशात एक नंबरवर असलेली लातूर महानगरपालिका मात्र अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली असल्याचे दिसून येत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे जागोजागी नाल्या तुंबल्या आहेत. तसेच अनेक आठवडे व महिनाभरातही कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. असे वास्तव चित्र असताना लातूरचे विद्यमान आमदार अमित देशमुख हे  लातूरकरांच्या स्वप्नातले शांघाय करू असे व्यक्तव्य करून लातूरकरांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे लातूर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व नागरिकांनी ट्रॅक्टरद्वारे लातूर महानगरपालिकेसमोर कचरा टाकून लातूर महानगरपालिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने केली. यावेळी या निदर्शने आंदोलनाला बालाजी शेळके, भाजपा महात्मा बसवेश्वर मंडळ अध्यक्ष संजय गिर, बालाजी गाडेकर, शशिकांत हांडे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अंँड. गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोष ठाकूर, पूनम पांचाळ, मंडल अध्यक्ष रविशंकर लवटे, धनंजय अवस्कर, उपाध्यक्ष अँड. पंकज देशपांडे, गजेंद्र बोकन, संतोष जाधव, राजेश पवार, सिद्धेश्वर उकरडे, सुनील डोळसे, प्रगती डोळसे, प्रियंका जोगदंड, आफरीन खान, महादेव पिटले, संतोष तिवारी, सुनील राठी, सचिन जाधव, अजय कोटलवार, गणेश खाडप, आकाश बजाज, पांडुरंग बोडके, आकाश जाधव, अमर पाटील, हनमंत काळे, चैतन्य फिस्के, आकाश पिटले, निखील शेटकार, शिवाजी कामले, ओम राठोड, बालाजी खमामे, भगवेश्वर धनगर, बाप्पा शेवाळे, अंकुश नरवाडे, पंडगे दादा, हरी आयतनबोने, मुस्तफा शेख, योगेश गंगने, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने