रामनाथ विद्यालयामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

श्री रामनाथ विद्यालयामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
आलमला- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला येथे दिनांक 26 जून 2023 रोजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम रामनाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.सी. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने