शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाविषयी 21 जुलैला लातूर येथे क्रीडा संयोजक, शिक्षकांची बैठक

शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाविषयी 21 जुलैला लातूर येथे क्रीडा संयोजक, शिक्षकांची बैठक

 लातूर : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत लातूर जिल्हा क्रीडा परिषद आणि लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत 21 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजता लातूर येथील दयानंद महाविद्यालय सभागृहात क्रीडा संयोजक आणि क्रीडा शिक्षक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.

दरवर्षी शालेय खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी, भविष्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी, शासकीय जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन विविध खेळ व वयोगटात करण्यात येते. सन 2023-24 मध्ये आयोजित करावयाच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत महापालिका लातूर, उदगीर, निलंगा, औसा, रेणापूर, देवणी, जळकोट, अहमदपूर, चाकूर आणि शिरूर अनंतपाळ  तालुक्यातील क्रीडा संयोजक, क्रीडा शिक्षक यांची बैठक 21 जुलै रोजी होणार असल्याचे श्री. लकडे यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने