या हंगामात 3 लाख मेट्रिक टन गाळपांचा संकल्प -श्रीशैल उटगे

या हंगामात 3 लाख मेट्रिक टन गाळपांचा संकल्प -श्रीशैल उटगे
संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन


औसा प्रतिनिधी

बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. यातूनच मंगळवार (ता. 11)मिल रोलरचे पूजन विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यांचे व्हाइस चेअरमन श्रीशैल उटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
          संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यांच्या मिल रोलर पूजन प्रसंगी बोलताना व्हाइस चेअरमन तथा कारखान्यांचे विद्यमान संचालक श्रीशैल उटगे म्हणाले की या मागील हंगामात  कारखान्याचे उदीष्टा प्रमाणे वेळेत गाळप करून सहकारमहर्षी मा. श्री दिलीपरावजी देशमुख ,माजी पालकमंत्री मा. आ. श्री अमित देशमुख साहेब व लातूर जि.म.मह बँकेचे चेअरमन मा. आ. श्री धिरज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व वेळोवेळी सहकार्य  सध्याचे संचालक मंडळ कर्मचारी व सर्व विभाग प्रमुखांनी उत्तम प्रकारे कार्य केले असून त्यांच्या मेहनतीमुळेच आज कारखाना उत्कृट पध्दतीने चालत असून एकमेकांचा समन्वय चांगला झाल्यानेच प्रत्येक विभागाने स्वतः ची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्यामुळेच मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांमध्ये मारुती महाराजच्या साखरेला सर्वात जास्त भाव मिळाला आहे.परिसरांतील शेतकऱ्यांचा ऊस पण वेळेवर गाळप झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून यावर्षी पण सर्वांनी मिळून 3 लाख मेट्रिक टन गाळपांचा संकल्प करून कार्य करावे असे आवाहन याप्रसंगी बोलताना मांजरा चे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे म्हणाले. यावेळी कारखान्यांच्या विविध विभागांतील कर्मचारी यांच्या समस्या पण उटगे यांनी समजून घेतल्या. या मिल रोलर प्रसंगी याप्रसंगी संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्यांचे चेअरमन गणपतराव बाजुळगे,व्हाईस चेअरमन शाम भोसले, सचिन पाटील,हणमंत माळी,शामराव साळुंखे ,गितेश शिंदे,हरिश्चंद्र यादव,विलास पाटील,उदयसिंह देशमुख, यांच्यासह अनेक संचालक यांच्यासह कारखान्याचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी केले...

1100 वृक्ष लागवड करण्याचे नियोजन....चेअरमन गणपतराव बाजुळगे
संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना  स्थळांवर आज रोलर पूजन झाल्यानंतर कारखाना परिसरात 1100शे वृक्ष लागवड रोपे लागवड करायची असुन आज प्रायोगिक तत्वावर मिल रोलर पुजन प्रसंगी सर्व संचालक यांच्या हस्ते आज 101 केशर आंबा लागवड करण्यांचे नियोजन असून बाकी विविध प्रकारची फळझाडे व सावलीचे 1000 वृक्ष लागवड लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी चेअरमन गणपतराव बाजुळगे यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने