गुरू पौर्णिमा संगीत महोत्सवाची सांगता

गुरू पौर्णिमा संगीत महोत्सवाची सांगता
औसा/ प्रतिनिधी- येथील माऊली प्रतिष्ठान व माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी मुक्तेश्वर मंदिरात गुरू पौर्णिमा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  पं. शिवरुद्र स्वामी गुरुजी यांच्या माऊली संगीत विद्यायतील सर्व शिष्यानी गुरुजींच्या पाद्यपूजानंतर  गायन वादन सादरीकरण करून  गुरूपौर्णिमा साजरी केली.
       यावेळी  सुनील चेलकर, भालचंद्र पाटील, राजाभाऊ जंगले, विश्वनाथ धुमाळ, नरशिंग राजे, गजेंद्र जाधव, चैतन्य पांचाळ, व्यंकटराव राऊतराव, हणमंत लोकरे, खंडू क्षीरसागर, अथर्व घाडगे, सिद्धी अजने, श्रुष्ठी नारंगवाडे, आशा सोमवंशी यांचे गायन  तर कैवल्य पांचाळ, महेश डोके, चैतन्य मुसाडे, विश्वजित डोके, ओमकार चव्हाण यांनी वादनाची साथसंगत केली.
        पं. शिवरुद्र स्वामी यांनी राग शुद्ध कल्याण, ठुमरी व भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी मुक्तेश्वर देवालय न्यास चे अध्यक्ष अड. मुक्तेश्वर वागदरे, मुक्तेश्वर शिक्षण प्र. मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, लोकाधिकार संघ प्रमुख व्यंकटराव पन्हाळे, कापड व्यापारी अर्जुन ढगे यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते.

           

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने