साने गुरुजी आय.आय.टी. फाउंडेशन मध्ये रंगला दिंडी सोहळा

 साने गुरुजी आय.आय.टी. फाउंडेशन मध्ये रंगला दिंडी सोहळा 


लातूर:  महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा होय ! आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांना  संस्काराची,परंपरेची,एकात्मतेची जाणीव तसेच साधुसंतांचे माहेरघर,वैष्णवांचे राऊळ म्हणजे पंढरीचा *विठ्ठल* हा
बापड्यांचा मायबाप,
दीनदयाळूचा हृदयसम्राट,
पांडुरंग माझा हो....
पांडुरंग माझा..! 
या पांडूरंगाच्या भक्तांनी मानव जातीच्या पलीकडे जाऊन संतांनी दिलेला संदेश *म्हणजे "हे विश्वची माझे घर"* ही संकल्पना प्रत्यक्षात समाजात बिंबवली.याची जाणीव बालवयापासूनच होण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त साने गुरुजी आय.आय.टी. फाउंडेशन, लातूरच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेची दिंडी काढण्यात आली. या दिंडीत वारकऱ्यांच्या,विठ्ठल- रुक्मिीनीच्या वेशभूषेत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

संस्था सचिव कालिदास माने  यांच्या हस्ते पालखीचे पूजन व आरती करण्यात आली. तसेच शाळेच्या प्राचार्या पुरी एस.आर, प्रशासकीय अधिकारी जी. टी. माने व उषा आडे- राठोड,गजानन पाटील, ज्ञानेश्वर हराळे , गंगाधर पाटील, रवी मोरे, मेघा शेटे मॅडम, प्राची किराणे, सपना हनवते,शितल सुर्यवंशी, सुवर्णा पाटील, सुरवसे मॅडम,मनीषा चिरके आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालखी सोहळ्या बरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नृत्य सादर केले. हे नयनरम्य प्रतिदृश्य, सोहळा म्हणजे -देवा सरूदे माझे मी पण l
तुझ्या दर्शने उजळो जीवन ll 

महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यातील गोरगरिबांना सुखावणारे सुप्रसिद्ध भक्तीमय स्थळ सुखाचे हे सुख चंद्रभागेतटी । म्हणजे विठुरायाची पंढरी होय.

या प्रसंगी संस्थेचे सचिव कालिदास माने यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या, पालखी व विठ्ठलाच्या आरतीने दिंडीची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने