बोरगावच्या नकुलेश्वराचा काला

बोरगावच्या नकुलेश्वराचा काला
औसा/ प्रतिनिधी -प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथील नकुलेश्वरांचा आज गोपाळकाल्याने सांगता होणार असून या काल्यासाठी पंचकोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात.
गेल्यात चार दिवसापासून गावात विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू असतात शिवाय नकुलेश्वराच्या पालखीची ग्रामप्रदर्शना होत असून आजही ग्रामप्रदर्शना होऊन नकलेश्वराचा काला मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथे हेमाडपंथी नकोलेश्वराचे मंदिर असून या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर पंचकोशीतील भाविक भक्तही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन आपण बोललेले नवस फेडण्याचे कार्य करत असतात तर कोणी भजनात तल्लीन होऊन भजन करत असतात तर कोणी भारुड म्हणत असतं तर कोणी भारुड म्हणत तर कोणी सोंगाडे होऊन आपली कला सादर करत असतात.
गावाला वाजत गाजत ग्राम प्रदर्शना  घालून येथील चौकात पालखी आल्यानंतर त्या ठिकाणी  भारुड भजन व सोंगाडे इत्यादी खेळ खेळले जातात आणि त्या ठिकाणाहून पालखी नकोलेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरात पालखी गेल्यानंतर त्या ठिकाणी पंचमहाभूताने बनवलेल्या मनुष्य जीवन कसे असते शिवाय श्रीकृष्णाविषयी बरेच असे मार्गदर्शन यावेळी केले जाते. उपस्थित सर्व भाविक भक्त शांतपणे  माहिती ऐकून घेत एवढेच काय तर माणसाच्या प्रत्येक अवयवाचे महत्व यावेळी सांगितले जाते. नंतर काला फोडला जातो. यावेळी बोरगाव नगरीसह पंचकोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात.
याच मंदिरात शेमाडपंथी शिलालेख सापडलेले असून त्या शिलालेखाचे वाचनही पूर्वी झालेला आहे. उपस्थित सर्व भाविक भक्ताने शांततेत दर्शन घ्यावे व नकलेश्वराच्या काल्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी आव्हान देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने