लातूर येथे विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्याचा शासन निर्णय जाहीर माजी मंत्री, आ. अमित देशमुख यांच्या पाठपुराव्यातून लातूर येथे आणखी एक विभागीय यंत्रणा कार्यान्वीत

 लातूर येथे विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्याचा शासन निर्णय जाहीर माजी मंत्री, आ. अमित  देशमुख यांच्या पाठपुराव्यातून लातूर येथे आणखी एक विभागीय यंत्रणा कार्यान्वीत




लातूर/ प्रतिनिधी : मराठवाडा विभागातील लातूर, धाराशीव, नांदेड व हिंगोली जिल्हयातील
पशुसंवर्धनातील अडचणी दूर व्हाव्यात, दुग्धव्यवसाय वाढीस लागावा यासाठी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
पाठपुराव्यातून लातूर येथे मंजूर झालेल्या स्वतंत्र विभागीय पशुरोगनिदान
प्रयोगशाळा स्थापन होण्याच्यादृष्टीने ११ पद मान्यतेचा शासन निर्णय जाहीर
झालला असून लवकरच सदरील प्रयोगशाळा कार्यान्वीत होणार आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार धीरज विलासराव देशमुख
यांच्या मागणीनुसार माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
लातूर येथे विभागीय पशुरोगानिदान प्रयोगशाळा सुरू करण्याच्यादृष्टीने
कार्यवाही सुरू केली होती. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून शासनाच्या
मंजूरीसाठी सादर केला होता. विदयमान सरकारच्या काळात १३ जून रोजी
मंत्रीमंडळ बैठकीत लातूर येथे विभागीय पशुरोगनिदान प्रयोगशाळा स्थापन
करण्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे. आता या संदर्भातील शासन
निर्णय जाहीर झाल्यामुळे सदरील प्रयोगशाळा प्रत्यक्षात सुरू होण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी मराठवाडयातील पशुपालकांना पशुपक्षांमधील
रोगनमुने तपासणीसाठी औरंगाबाद अथवा पूणे येथील प्रयोगयशाळेवर अवलंबून
रहावे लागत होत. पशुरोगाचे निदान होण्यास वेळ लागत असल्यामुळे
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. लातूर येथे आता ही प्रयोगशाळा स्थापन
होत असल्यामुळे लातूर, धाराशीव, नांदेड व हिंगोली या चार जिल्हयासाठी
उच्च्दर्जाची अत्याधूनीक पशुवैदयकीय सेवा उपलब्ध होऊन रोगनिदानाचे कार्य
जलदगतीने व वेळेत होणार आहे. यामुळे पशुधन व पक्षांमध्ये होणाऱ्या
रोगाप्रादूर्भावर नियंत्रण करता येणार आहे. परिणामी शेतकरी पशुपालकांची
गैरसोय दूर होऊन त्यांचे संभाव्या नुकसान टाळता येणार आहे.
लातूर येथे स्थापन होणाऱ्या प्रयोगशाळा इमारत उभारणीसाठी जिल्हया वार्षीक
योजनेतून खर्च करावयाचा आहे असे या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.
या कार्यालयासाठी २ कोटी ५१ लाख रू. खर्चास मान्यता देण्यात आली असून
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट-अ (संख्या – २), पशुधन अधिकारी गट अ, सहायक
पशुधन विकास अधिकारी गट क, पशूधन पर्यवेक्षक गट क, कनिष्ठ लिपीक गट क,
प्रयोगशाळा सहाय्यक गट – क, वाहन चालक गट – क, परिचर गट – क (संख्या – ३)
अशा एकुण ११ पदाला मंजूरी या आदेशाव्दारे दिली आहे.
लातूर येथे यापूर्वीच जवळपास ३० कार्यालये कार्यान्वीत असून आत या
प्रयोगशाळेमूळे आणखी एका विभागीय व्यवस्थेची भर पडली आहे. मराठवाडयातील
पशूधन व दुग्धव्यवसाय वाढीस यातून चालना मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने