मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करणार-खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

 मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करणार-खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

लातूर- दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने केंद्र सरकारने राज्य सरकारची आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त करावी या करिता आंदोलन सुरू असून मराठा समाजास या अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभरातून अनेक कार्यकर्ते आंदोलन करण्यास जंतर-मंतर येथील मैदानावर उपस्थित होते. आज एक दिवशीय आंदोलन करण्यात आले होते. यापूर्वी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता तारांकित प्रश्न विचारून यावरती सभागृहाचे लक्ष वेधले होते. राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवून ते 50 टक्के ची मर्यादा ओलांडणारे असल्याचे आपल्या निर्णयात म्हटले होते. यानंतर महाराष्ट्रातून मराठा समाजास 50% ची मर्यादा न ओलांडता आरक्षण देण्याबाबत अथवा या आरक्षणाची केंद्र सरकारने 50% पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा वाढवावी अशी मागणी नव्याने करण्यात येत आहे विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या आंदोलनाच्या वेळेस उपस्थित राहून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला तसेच मराठा आरक्षणासाठी यापुढेही पाठपुरावा करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे उद्गार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्ली येथील जंतर-मंतर येथील मैदानावरील आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करते वेळेस काढले याप्रसंगी महाराष्ट्रातील काना कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने