हासेगाव फार्मसीत हर घर ध्यान अभियान

हासेगाव फार्मसीत हर घर ध्यान अभियान
          औसा (प्रतिनिधी) -श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था  संचलित लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव  महाविद्यालयांमधील  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या  माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत  हर घर ध्यान अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उत्कर्ष सामाजिक संस्था आर्ट ऑफ लिविंग च्या अध्यक्ष सौ सुरेखा मस्के,  संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे,प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ),मान्यवर  उपस्थित होते.अनामिक भीती कमी होते.भावनात्मक स्थिरता वाढते.सृजनात्मकता वाढते.
आनंद वाढतो.अंतर्ज्ञान (तात्कालिक ज्ञान) विकसित होते.परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते आणि मानसिकशांती मिळते.समस्या छोट्या वाटू लागतात.एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि विश्रांतीमुळे मनाचा विस्तार होतो.कुशाग्र मनाचा विस्तार न झाल्यास तणाव, राग आणि निराशा वाढते.विस्तारित चेतना जर कुशाग्र नसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही.तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास मदत होते.आपल्यातील वृत्तींमुळेच आपण आनंदी किंवा दु:खी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते.अशी  माहिती कार्यक्रमाच्या माध्यमातून सौ सुरेखा मस्के यांनी सांगितले . 
            लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी  लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर  , महाविद्यालातील रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश बनसोडे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. कोळसुरे जयश्री  यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने