राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी महादेवी पाटील यांची निवड

 राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी महादेवी पाटील यांची निवड
निलंगा (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे असलेल्या.तालुक्यातील सौ.महादेवी पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी निवड करण्यात आली.यापूर्वी सौ.पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला निलंगा तालुकाध्यक्ष म्हणून 10 वर्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला लातुर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून 4 वर्ष कार्य केले आहेत.ही निवड राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी केली आहे.मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे सौ.महादेवी पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले.संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैशालीताई मोठे यांनी कामाची दखल घेऊन व लातुर महिला जिल्हा अध्यक्ष मिनाक्षीताई शिगडे यांच्या शिफारसी वरून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे. ही निवड झाल्यानंतर सौ.पाटील म्हणाल्या की,राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटन अधिक मजबूत करणार असून शरद पवार साहेबांचे विचार,महिला धोरण सर्व सामान्य महिला पर्यंत पोहचविणार आहे.सौ.महादेवी पाटील यांनी निवडीबद्दल  पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखविला त्या बद्दल सर्वांनचे व्यक्त केला आहे .
   यावेळी मसलगे सुधीर -निलंगा विधानसभाध्यक्ष,संदीप मोरे-निलंगा विधानसभा कार्याध्यक्ष,अंगद जाधव-जिल्हा उपाध्यक्ष,ईस्माईल लदाफ-निलंगा शहराध्यक्ष,रेखाताई कदम लातुर शहराध्यक्ष,समिक्षा मेटे युवती शहराध्यक्ष लातुर,वंदनाताई सोळुंके-जिल्हा सरचिटणीस (महिला),माजी आमदार कै.श्रीपतराव सोळुंके यांची कन्या मंगलताई पाटील निलंगा विधानसभा (महिला आघाडी),किरण सोळूंके प्रदेश सरचिटणीस सोशल मिडिया सेल मराठवाडा विभाग ,राम पाटील -जि.युवक उपाध्यक्ष,महेश चव्हाण- ता.युवक कार्याध्यक्ष,सुरेश रोळे जि.सरचिटणीस(किसान सेल), कोमलताई देशपांडे (तालका सरचिटणीस),स्वप्नील होसुरे-तालुका कार्याध्यक्ष(सोशल मिडिया ),संतोष जाधव ता.उपाध्यक्ष,व्यंकट सुर्यवंशी, ता चिटणीस,बालाजी जोडतले,ता.कार्याध्यक्ष( ओबीसी सेल),लक्ष्मण क्षिरसागर-ता सरचिटणीस,पंढरी पाटील ता.अध्यक्ष (किसान सेल)अँड गोपाळ इंगळे-शहर कार्याध्यक्ष,मुश्ताक बागवान-निलंगा शहर युवक कार्याध्यक्ष, राजकुमार माने ता.प्रसिद्धीप्रमुख,ता.उपाध्यक्ष. अहमद बागबान 
महादेवी पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश चिटणीस पदी निवडीबद्दल जिल्ह्यातील तालुक्यातील पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने