लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत

 लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह

मुसळधार पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत

·        नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

लातूर : जिल्ह्यात 25 ते 26 जुलै 2023 दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचे, तसेच 27 जुलै 2023 रोजी एक ते दोन ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. या कालावधीत विजा कोसळण्याची शक्यता असल्याने सर्व शेतकरीनागरिक यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विजांचा कडकडाट सुरु असताना घराबाहेर जाणे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करु नयेत. या कालावधीमध्ये विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखालीपाण्याच्या स्त्रोताजवळविद्युत खांबाजवळ बांधू नयेतत्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वत: सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ अथवा नदीजवळ जावू नयेआपल्या मुलांना जलसाठेनदीवर पोहायला पाठवू नये. शाळामाविद्यालायाच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे.

पुलावरून अथवा नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूलनाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. काढणीसाठी ठेवलेली पिके सुरक्षितपणे झाकून ठेवावीत. पाऊस सुरु असताना विजेच्या ताराजुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावीअशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच या कालावधीत पोलीस अधिकारीतलाठीमंडळ अधिकारीग्रामसेवककृषि सहाय्यक यांनी आपले मुख्यालय सोडू नयेअसे लातूरचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने