अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

 अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

·        10 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार

लातूर: धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानितविनाअनुदानितकायम विनाअनुदानित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगीक प्रशिक्षण संस्थानगरपालिकानगरपरिषदशाळा व दिव्यांगांच्या शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या 18 जुलै 2023 रोजीच्या पत्रानुसार ही योजना राबविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत.

अल्पसंख्यांक विभागाच्या 7 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगीक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी संस्था चालकांनी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव, शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा नियोजन अधिकारीनवीन जिल्हाधिकारी कार्यालयबार्शी रोडलातूर या कार्यालयात सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने