अशोक बंगल्यावरती अशोक पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर उसळला

अशोक बंगल्यावरती अशोक पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर उसळला 
निलंगा/प्रतिनिधी-विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.वाढदिवसाची दिनचर्या ठरल्या प्रमाणे सर्व प्रथम मातोश्री सुशीलादेवी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आशीर्वाद घेऊन ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आले.तद्नंतर सिंदखेड रोडवर असलेल्या दादाबाग येथे जाऊन माजी मुख्यमंत्री कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन त्यानंतर मातोश्री आजी वत्सलाबाई पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शहरातील पिरपशा दर्गा व दादापीर दर्गा येथे चादर चढवून दर्शन घेतले.शहरातील हुतात्मा स्मारक यावर देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर महाराष्ट्र फार्मसी व महाराष्ट्र महा विद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. व उपजिल्हा रुग्णालयात महाविकास आघाडीच्या वतीने निमित्ताने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिलेल्या पैकी कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मंत्री यशोमती ठाकूर,दिलीप राव देशमुख,ईश्वर खंडरे,मा.अध्यक्ष युवक काँग्रेस सत्यजित तांबे,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,आमदार अमर राजूरकर,मंत्री ईश्वर खंडरे,माजी मंत्री बस्वराज पाटील मुरूमकर,प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे,माजी मंत्री वर्षा गायकवाड,माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील,आ. बाबासाहेब पाटील,आमदार. अभिमन्यू पवार,मा.मंत्री मधुकर चव्हाण,अंबाजोगाई मा. नगराध्यक्ष पापा मोदी शहरातील, मतदार संघासह जिल्हातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत सर्व शाळा महाविद्यालय,व्यापारी बार असोसिएशन,डॉक्टर,शिक्षक प्राध्यापक,जिल्हा म. बँकेचे सर्व कर्मचारी,विविध का.सो.चेअरमन,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस,वंचित आघाडी,आर.पि.आय.,महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,विविध पदाधिकारी,सर्व सामान्य नागरिक,शेतकरी,शेतमजूर यांनी हजारो संख्यने कार्यक्रमास शुभेच्छा देण्यास गर्दी केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने