महाऊर्जा स्थापनेचा ३८ वा वर्धापन दिन विभागीय कार्यालयात उत्साहात


महाऊर्जा स्थापनेचा ३८ वा वर्धापन दिन विभागीय कार्यालयात उत्साहात
लातूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण' महाऊर्जा स्थापना दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. स्थापना दिवसाचे औचित्य साधून विभागीय कार्यालय लातूर येथे उर्जा व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर विभागीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक समीर घोडके होते. महाराष्ट्र प्रगतिशील आणि बलशाली करण्यासाठी ऊर्जा व्यवस्थापन अति आवश्यक असल्याचे प्रतिपादन समीर घोडके यांनी कार्यक्रमात केले. महाऊर्जा यांच्या विविध शासकीय उपक्रम, योजना आणि ध्येय धोरण याचा यावेळी कार्यक्रमात आढावा घेण्यात आला. कार्यक्रमात ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर व इतर महाऊर्जा कार्यालयाचे कर्मचारी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. ऊर्जा बचती च्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणे, त्याची ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी गावांमध्ये प्रायोगिक स्वरुपात ’आदर्श ऊर्जा कार्यक्षम ग्राम’ मोहीम, जिल्हा स्तरीय ऊर्जा संवर्धन पार्क आदी योजना अनेक ठिकाणी राबविली गेल्यास त्याचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल असे मत ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी मांडले. ऊर्जा संवर्धन विभागाद्वारे राबविण्यात येत असलेली कामे, योजना व ध्येय-धोरण कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप ऊर्जा संवर्धन प्रतिज्ञेने करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने