शहराच्या विकासासाठी १५ कोटींचा निधी मंजूर-आ.अभिमन्यू पवार

 शहराच्या विकासासाठी १५ कोटींचा निधी मंजूर-आ.अभिमन्यू पवार
औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे औसा शहराच्या विकासकामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून ३५ वेगवेगळी पायाभूत सुविधा विकासकामे केली जाणार आहेत.औसा शहरासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे औसा शहरवासीयांच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांनी आभार मानले आहेत. 

             या निधीतून औसा शहरातील के. के. नगर मध्ये सत्तार बागवान यांचे घर ते आपसिंगेकर रो हाऊस पर्यंत रस्ता बांधकाम करणे ३० लक्ष रुपये, माळी गल्ली ते भादा वळण रस्त्यापर्यंत रस्ता २० लक्ष रुपये, कुंभार स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधकाम १५ लक्ष, ग्रामीण रुग्णालय ते कारंजे खड़ी केंद्र पर्यंत रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करून रस्ता सुधारणा करणे ५ कोटी, औसा बाजार समीती च्या अंतर्गत रस्ता सुधारणा कामांसाठी १ कोटी, औसा - याकतपूर - सारोळा रस्तालगत च्या हदद वाढीच्या परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम करणे ३ कोटी रुपये, याकतपुर रोड ते केशव बालाजी मंदिर जाणाऱ्या रस्त्याचे उर्वरित काम आणि रस्त्याशेजारी पथदिवे बसवून विद्युतीकरण करणे ३५ लक्ष, औसा येथे श्रीराम मंदिर जाणारा रस्ता बांधकाम करणे २० लक्ष रुपये, कटघर गल्ली मुस्लिम कब्रस्थानास संरक्षण भिंत बांधकाम करणे १० लक्ष, किल्ला रोड ते सय्यद सादात (र.) दर्गाह पर्यंत रस्ता व नाली बांधकाम १० लक्ष रूपये, सय्यद सादात दर्ग्याजवळील खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष, नागरसोगा रोड ते मज्जिद ए हमिदिया पर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे तसेच रियाज कॉलनी मेन रोड से मज्जिद ए रियास पर्यंत रस्ता करणे १५ लक्ष रुपये, अन्सार नगर सारोळा रोड ते मज्जिद ए नावाबोद्दिन पर्यंत रस्ता व नाली बांधकाम १५ लक्ष के. के. नगर येथील मज्जिद ए उम्मे कुलसुम येथे रस्ता व नाली बांधकाम करणे १० लक्ष, सारोळा रोड ते मज्जिद ए चांद तारा पर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे १० लक्ष रूपये, कृषी उत्पादन बाजार समिती मेन रोड ते मज्जिद ए अब्बूबकर पर्यंत रस्ता करणे १० लक्ष, हजरत सय्यद ताजोदिन बाबा (र.) दर्ग्याजवळील खुल्या जागेत सभागृह व संरक्षण भिंत बांधकाम करणे २० लक्ष, कादरी नगर येथील चव्हाण यांचे घर ते मज्जिद ए कादरी ते नागपूर रत्नागिरी महामार्ग पर्यंत रस्ता व नाली बांधकाम १० लक्ष, हजरत खाके शफा दर्ग्याजवळील खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे २० लक्ष, कालन गल्ली येथील अशुर खानाचे बांधकाम करणे १० लक्ष रूपये, अन्सार नगर येथील युनुस शेख यांचे घर ते सलीम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे तसेच जमाल नगर येथील मज्जिद ए जमाल ते शेख शकील यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे २० लक्ष, नागरसोगा जुना रस्ता येथील मदरसा सिद्दीखी अकबर ते नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग पर्यंत रस्ता करणे १० लक्ष, हाश्मी नगर नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग ते मुईस शेख यांच्या घरापर्यंत रस्ता करणे १० लक्ष, चर्मकार समाज स्मशानभूमी शेड बांधकाम व शुशोभीकरण करणे १० लक्ष रूपये, शहरातील राजपूत / मारवाडी समाज स्मशानभूमी शेड बांधकाम व शुशोभीकरण १० लक्ष, गवंडी समाज स्मशानभूमी शेड बांधकाम व शुशोभीकरण १० लक्ष, नाव्ही गल्ली येथील महादेव मंदिराजवळील खुल्या जागेत सभागृह बांधकाम १५ लक्ष , प्रभाग ७ मधील ब्राम्हण गल्लीत नरसिंह मंदिराजवळील खुल्या जागेत सभागृह बांधकाम १० लक्ष रुपये, 

                याचबरोबर औसा शहरातील तक्षशीला बौद्ध विहार परिसरात ध्यानधारणा केंद्र बांधकाम करणे व संरक्षण मिंत बांधकाम १ कोटी रुपये, औसा येथील पुरातन श्रीराम मंदिराजवळील खुल्या जागेत सभागृह बांधकाम ५० लक्ष रुपये, प्रभाग क्र. १ मधील ज्ञानेश्वर मिठापल्ले यांच्या घराशेजारील रस्त्याचे व नाली बांधकाम २० लक्ष , हाश्मी नगर येथे इमरान सय्यद यांचे दुकान ते सलीम पानसे यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम १० लक्ष, लेक्चर कॉलनी मध्ये नालीसह रस्त्याची सुधारणा कामे ५० लक्ष रुपये आदी कामे केली जाणार आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने