अधुनिकीकरणामुळे बैलगाडी नामनिशेष

अधुनिकीकरणामुळे  बैलगाडी नामनिशेष  

औसा/प्रतिनिधी - आधुनिकीकरणाच्या ध्यास घेऊन त्यामागे धावत आसलेल्या शेती व्यवसायाला जुनं ते सोनं याचा विसर पडतोय का काय अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बदलत्या काळात दळणवळणाच्या साधनांमध्ये औसा तालुक्यात बैलगाडी आणि शेती कामातून बैल हि कालबाह्य होत चालले आहेत. सध्या जातीवंत बैल बोटावर मोजण्या इतके पाह्यला मिळत आहेत. तर बैल म्हटले की बैलगाडी आलीच ती हि नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ज्यांचा हा बैलगाडी बनविण्याचा व्यवसाय आहे त्या घटकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली असल्याचे दिसत आहे. 
       याबाबत बैलगाडीच्या पारंपारिक व्यावसायातील बैलगाडी मालकांना याबाबत संवाद साधला असता.
त्यांनी सांगितले की बैलांच्या वाढत्या किंमती, त्याला लागणारा खर्च आणि सांभाळण्यासाठी मनुष्य बळाचा अभाव व वाढती महागाई तसेच आपल्या कडे सतत होणारा पाणी टंचाई,चारा ,कमी जमीनी यामुळे नामशेष होऊ लागला असल्याचे निदर्शनास येत आहेत.औसा तालुक्यात बरेच गावात बैलगाडी आणि पशुधन सांभाळणारी, अनेक घराणी होती. परंतु कालांतराने दळणवळणातील आधुनिक साधनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. दळणवळणातील जलद आणि वेगवान अशा अत्याधुनिक वाहनांचा काळानुसार सर्वत्र सर्रास वापर होऊ लागला आहे. त्यामुळे बैलांच्या साह्याने ओढले जाणारे दोन चाकांची बैलगाडीचे वाहन या अत्याधुनिक दळणवळणाच्या साधनातून मागे पडले आहे.तर शेतीमध्ये देखील शेतकरी शेतीची नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टर पॉवर टिलरचा वापर करत आहेत. त्यामुळे आमचे चार दोन बैलांचे नांगर आहेत. या नांगराची मागणी देखील थांबली असल्याचे त्यांनी सांगितले.     
          पूर्वीच्या काळात बैलगाडी बनवायची म्हणून शेतकरी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे लाकडे तोडायचा सुतार वाड्यामध्ये व तीन चार महिने लागायचे हि बैल गाडी बनविण्यासाठी पण ते बंद झाले त्यानंतर कांहीं दिवस लोखंडी बैलगाड्या आल्या पण त्याही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेती कामे व बैल गाडीसाठी बैल मिळावेत म्हणून शेतकरी जातीवंत देशी गायी पाळायचे पण आता केवळ दुध उत्पादन घेण्यासाठी शेतकरी संकरीत गायी पाळत आहेत. संकरीत गायींना जन्मलेले बैल शेतीकामात व बैल गाडीसाठी उपयोगी पडत नाहीत.पडले तरी ते क्वचितच अशी अवस्था आहे.बैलपोळा हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा होतो. पूर्वी श्रावण महिना सुरू झाला की शेतकरी बैल पोळ्याच्या तयारीला लागायचे अनेक गावांमध्ये बैलांच्या मिरवणुका काढल्या जायच्या चार-चार पाच-पाच तास या मिरवणुका चालायच्या पण आता बैल पोळ्याच्या या मिरवणुका हि बोटावर मोजण्या इतक्याच निघताना पाहयला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जिव्हाळा आसलेले बैल आणि बैलगाडी हि नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे मात्र नक्की.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने