मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कोर्स

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण कोर्स
औसा / प्रतिनिधी-"छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (CSMS-DEEP) अंतर्गत, महाराष्ट्र नॉलेज कापोरेशन लि. (MKCL), पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 'सारथी' संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला असून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांअंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या १८ ते ४५ या वयोगटातील उमेदवाराकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तालुकास्तरापर्यंत सारथी संस्थेमार्फत निःशुल्क (मोफत) व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण घेणेसाठी सारथी लक्षित गटातील पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सारथी सदर प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि. (MKCL), पुणे या संस्थेमार्फत राबविण्यात येत असून लातूर जिल्हातील एमकेसीएलच्या निवडक अधिकृत अध्ययन केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश, आयटी स्किल्स हे दोन अभ्यासक्रम शिकवले जाणार असून इतर दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडायचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेले स्किल्स शिकता येतील व स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. 
सदर प्रशिक्षणासाठीविषयी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळाचा उपयोग करावा असे आवाहन एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने