आ. रमेशअप्पा कराड यांनी दिलेला शब्द पाळला ; दर्जीबोरगाव,निवाडा,इंदरठाणा ग्रामस्थांकडून आभार

 . रमेशअप्पा कराड यांनी दिलेला शब्द पाळला दर्जीबोरगाव,निवाडा,इंदरठाणा ग्रामस्थांकडून आभार

        लातूर- काही दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर कार्यक्रमातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील मौजे दर्जीबोरगाव, निवाडा आणि इंदरठाणा येथे विकास कामे मंजूर करण्याचा दिलेला शब्द प्रत्यक्ष आमदार निधीचे पत्र देवून पाळल्याबद्दल तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

        भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचा रेणापूर तालुक्यातील मौजे दर्जीबोरगाव, निवाडा आणि इंदरठाणा या तिन्ही गावात काही दिवसापूर्वी दौरा झाला. या दौऱ्यात जाहीर कार्यक्रमातून बोलताना त्या त्या गावातील ग्रामस्थांना विकास कामाबाबत शब्द दिला होता. त्यानुसार आपल्या आमदार निधीतून दर्जीबोरगाव येथे बानाई देवीच्या मंदिर परिसर कंपाऊंड वॉलसाठी सात लक्ष रुपये, निवाडा येथील संगमेश्वर मंदिराच्या अर्धवट कंपाऊंड वॉल कामासाठी दहा लाख रुपये आणि इंदरठाणा येथील महादेव मंदिर सभागृह बांधकामासाठी सात लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला सदरील तिन्ही कामाबाबत आमदार निधीचे पत्र नुकतेच देण्यात आले.

         आप्पा गावात आले, त्यांनी विकास निधीची घोषणा केली आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने दर्जीबोरगाव, निवाडा आणि इंदरठाणा या तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचा लातूर येथिल भाजपाच्या संवाद कार्यालयात यथोचित सत्कार करून जाहीर आभार व्यक्त केले. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदेसंगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गोडभरले आणि श्रीकृष्ण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

          दिलेला शब्द मी शंभर टक्के पाळतो. मात्र काँग्रेसची आश्वासने खोटी असतात दिलेला शब्द कधीच पाळत नाहीत असे आंगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले कीनरेंद्रजी मोदी यांनी गोरगरीब सर्वसामान्य माणसांसाठी अनेक योजना सुरु केल्या चौफेर विकास केला मोदीजींच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक विविध योजनेचे आपण सर्वजण लाभार्थी आहोत. मोदीजीं शिवाय देशाला पर्याय नाही ही सर्वसामान्यांची भावना असून त्यांनी सुरु केलेल्या विविध योजनांची आणि त्यांच्या कामाची गावागावात चौकाचौकात आणि घरोघरी चर्चा घडवून आणावी. मोदीजींना मोठे समर्थन मिळावे यासाठी प्रयत्न करावेत येणार्‍या लोकसभा निवडणूकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या उमेदवाराला ५० हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले पाहिजे असे बोलून दाखविले.

          स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासून इंदरठाणा हे गाव भाजपाच्या विचाराचे आहे. इंदरठाणा येथिल ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात असून या गावच्या विकासाची माझी जबाबदारी आहे. इंदरठाणा गावापासून मांजरा नदीपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिवाळीपर्यंत काम सुरू केले जाईल त्याचबरोबर सर्वसोयीने युक्त असा शादीखाना लवकरच मंजूर करू अशी ग्वाही देवून तिन्ही गावातील विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही असे आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

        यावेळी दर्जीबोरगाव येथील सरपंच रमेश कटकेप्रकाश रेड्डीपुंडलिक सुरवसेअमृत गाडेकरशेख निजामबिभीषण सुरवसेअंकुश लोणकरगोकुळ सुरवसेकेशव सुरवसेरावसाहेब लांडगेवीरभद्र स्वामीसुग्रीव कटकेरावसाहेब शिंदे निवाडा येथील शिवमुर्ती उरगुंडेविठ्ठल कसपटेपृथ्वीराज उरगुंडेमहादेव उरगुंडेराजाभाऊ घाटोळे सूर्यकांत वाघमारेनागनाथ उरगुंडेचंद्रशेखर उरगुंडेराजाभाऊ नवाडे आणि इंदरठाना येथील सरपंच अविनाश रणदिवेउपसरपंच सय्यद इब्राहिमसय्यद वाजिदसय्यद सरदारबसवेश्वर साखरेसय्यद निजामविजयकुमार घोडकेदत्तात्रय अक्कलकोटे यांच्यासह तिन्ही गावातील भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने