गाव भागातील जीर्ण इमारती पाडण्यास सुरुवात

गाव भागातील जीर्ण इमारती पाडण्यास सुरुवात
    मनपाने दिल्या होत्या नोटीसा

 लातूर/प्रतिनिधी:पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारती कोसळून दुर्घटना होऊ शकते,हे लक्षात घेता अशा इमारती तात्काळ उतरवून घेण्याच्या नोटीसा मनपाने संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार कांही मालमत्ताधारकांनी आपल्या जुन्या इमारती उतरवून घेण्यास सुरुवात केली आहे.

   पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होऊ शकते. इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू शकते.अशा दुर्घटना टाळण्यासाठी मनपा दरवर्षी अशा मालमत्ताधारकांना नोटिसा देते.यावर्षीही मनपाने अशा जीर्ण इमारतीच्या मालकांना नोटीसा दिल्या होत्या.संबंधितांनी इमारती पाडल्या नाहीत तर मनपाकडून त्या पाडण्यात येतील.तसेच त्या खर्चाचा बोजा संबंधित मालमत्तेवर लावण्यात येईल,असे या नोटीसित सूचित करण्यात आले होते.संबंधित इमारतींवर नोटिसा डकविण्यात आल्या होत्या.त्यानंतर स्मरणपत्रेही पाठवली होती.

   शहरातील आझाद चौकातील गोपाळ हरिकिशन अग्रवाल यांनाही अशाच पद्धतीने नोटीस देण्यात आली होती.दि.१६ जुलै रोजी पहिली व २४ जुलै रोजी दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आल्यानंतर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी याचा आढावा घेतला होता.आयुक्तांनी केलेल्या सूचनेप्रमाणे झोन डी चे झोनल अधिकारी बंडू किसवे यांनी संबंधित मालकांना पुन्हा एकदा या इमारती उतरवून घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार इमारत मालक गोपाळ हरिकिशन अग्रवाल यांनी रविवार दि.३० जुलै रोजी स्वतः इमारत पाडण्यास सुरुवात केली.यामुळे या परिसरातील धोका कमी होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने