लातूर मध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन

लातूर मध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन

लातूर/प्रतिनिधी -राज्यात 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्यसाधून लातूर मध्ये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
     महसूल सप्ताह मध्ये लातूर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेषतः 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महसुल विभागाकडुन वितरित केली जाणारी जात प्रमाणपत्र, उत्पन्न, अधिवास, रहिवास, नॉनक्रिमीलयर प्रमाणपत्रे, EWS प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी, लातूर यांच्या मार्फत अर्ज वितरण व स्वीकृती व माहितीपत्रक उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या संदर्भात गट शिक्षणाधिकारी, लातूर व लातूर शहरामधील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेऊन या विशेष मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रचार व प्रसिध्द करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत.
    लातूर शहरातील शाळा / महाविद्यालयामध्ये महा ई- सेवा केंद्र चालक यांची नियुक्ती करण्यात येऊन संबधित महा ई -सेवा केंद्र चालकांना दिनांक 30/07/2023 पासुन नियुक्त केलेल्या शाळांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 1) राजस्थान विद्यालय 2) देशीकेंद्र विद्यालय 3) केशवराज विद्यालय 4) संसकार वर्धिनी विद्यालय
 5) जनता विद्यालय मुरुड 6 ) ज्ञानेश्वर विद्यालय 7)) पोलदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल 8 ) बस्वेश्वर महविद्यालय 9 ) शाहू महाविद्यालय 10 ) दयानंद महाविद्यालय,लातूर,या व्यतिरिक्त 2 ऑगस्ट रोजी DPDC हॉल (प्रशासकीय ईमारत जुने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर) येथे युवा संवाद कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहेत. तसेच अर्ज स्वीकृती / वितरण करण्यासाठी सेतुसुविधा उपस्थित असेल.
   1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान "महसुल सप्ताह साजरा करण्यात येत असुन सदर कार्यक्रमा दरम्यान खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
1 ऑगस्ट,2 ऑगस्ट :- युवा संवाद, 3 ऑगस्ट व 4 ऑगस्ट :- जनसंवाद,5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट :- महसुल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ तसेच :- सैनिक हो तुमच्यासाठी हे कार्यक्रम होणार आहे.महसुल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्याशी संवाद होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने