गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लातूर : राज्यस्तरीय योजने अंतर्गत सुरु असलेली गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन सुधारीत योजना सुरु करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गोशाळांनी 26 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत निवडण्यात येणाऱ्या गोशाळेस त्यांच्याकडे असलेल्या पशुधन संख्येनुसार अनुदान दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. गोशाळेत 50 ते 100 पशुधन असल्यास 15 लाख रुपये101 ते 200 पशुधन असल्यास 20 लाख रुपये आणि 200 पेक्षा जास्त पशुधन असल्यास 25 लाख रुपये अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 60 टक्केतर दुसऱ्या टप्प्यात 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुनामार्गदर्शक सूचनाअर्ज करण्याची पद्धत याविषयीची माहिती पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. या क्षेत्रामध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्रासह अर्ज करावेतअसे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने