महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

लातूर -मराठवाड्यात आर्थिक बँकींग सहकारी क्षेत्रात गतीने वाटचाल करणार्‍या

महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या गुळमार्केट,लातूर येथील मुख्य कार्पोरेट कार्यालयात महाराष्ट्र नागरी बँकेचे  उपाध्यक्ष एस.आर.मोरे यांच्याहस्ते 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन करून एम.एन.एस.बँकेतर्फे 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  

यावेळी एमएनएस बँकेचे संचालक संचालक सूभाषअप्पा सूलगुडले, रविंद्र कांबळे, अ‍ॅड.गंगाधर हामणे, अ‍ॅड स्वामी,जनरल मॅनेजर किशनसिंह गहिरवार, शाखा व्यवस्थापक प्रविण जाधव, वसुली अधिकारी विश्‍वनाथ सुरवसे, माधव गायकवाड, आदी मान्यवरांसह बँकेचे अधिकारी,कर्मचारी, पिग्मी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने