जिपप्राशाळा शाळा तळणीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह उत्साहात साजरा

जिपप्राशाळा शाळा तळणीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह उत्साहात साजरा
तळणी/प्रतिनिधी -येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी भारत माता शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ माता सावित्री राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि आपल्या देशातील ओरिसा पंजाबी गुजराती आंध्र प्रदेश महाराष्ट्र इत्यादी राज्यातील पोशाख परिधान करून सहभागी झाले होते यावेळी गावातील प्रत्येक कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तेथील कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अंबादास राव अण्णा यांच्या पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष माधव मुगळे, संभाजी भोसले ,संभाजी जाधव अमोल वसुळे ,बालाजी गायकवाड ,अंकुश पवार, श्रीकांत पाटील सह गावातील शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते
यावेळी शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी शिवराज जाधव याचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला आणि त्यांच्या पालकांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भाषण स्पर्धेत सहभाग नोंदवला यामध्ये सागर प्रताळे, अल्ताफ पटवारी उमेरा शेख, सैफ पटवारी, स्नेहा भुजबळ, श्रावणी भुजबळ, प्रणव भुजबळ, श्रावणी कुंभार, श्रावणी प्रताळे, स्नेहा बसुळे ,उजमा पटवारी ,संजीवनी गायकवाड ,संध्या प्रताळे, इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता यावेळी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य सादर केले.
स्वतंत्रता दिनाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सत्यप्रकाश भोसले हरीश बोने, रवी कुरील श्रीमती सुवर्णा कोळसुरे रंजना हादवे सोनाली गिरी दीपिका बरुरे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने