हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील क्रांतिकारी चळवळीचे नायक - क्रांतिवीर दत्तोबा भोसले
औसा/प्रतिनिधी-मातोळा येथील श्री माधवराव भोसले हायस्कूल येथे हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त जगदीश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचा दैदीप्यमान इतिहास जगदीश पाटील यांनी विद्यार्थी आणि गावकऱ्यांना सांगितला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले तंटामुक्ती अध्यक्ष ,शामबापू भोसले ( व्हा.चेअरमन , मा .म. शे .साखर कारखाना ) गोविंद भोसले ( मि.सरपंच ) राजेंद्र भोसले ( माजी सभापती ) संजय भोसले - प्राचार्य , माधवराव भोसले हायस्कूल,कमलाकार सावंत, माजी केंद्र प्रमुख ,संतोष आनंदगावकर, संचालक क्रांतीवीर दत्तोबा भोसले ॲकेडेमी आणि बबन (बाबासाहेब) भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती .
जगदीश पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की ,१६ जिल्ह्यांनी बनलेल्या या हैद्राबाद संस्थानात रझाकारांच्या अन्यायाने लोक पीडित होते. गावोगाव दहशत पसरली होती .शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या दत्तोबांनी राष्ट्रीय शाळा हिप्परगा ,तसेच सोलापूर आणि पुढे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या तालमीत बडोद्यातून शिक्षण पूर्ण केले .स्वराज्य स्वातंत्र्य देशभक्तीचे धडे घेतलेल्या दत्तोबांना मराठवाड्याचा आक्रोश शांत बसू देत नव्हता .या लढ्यात त्यांनी उडी घेतली .स्वतंत्र भारतातल्या लष्करी छावणीत ( कॅम्प ) शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले . पुढे त्यांच्या नेतृत्वात अनेक कॅम्पची स्थापना झाली. रझाकारांच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी तरुणांच्या फौजा तयार केल्या , त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरला , त्यांना प्रशिक्षण दिले .पोलिस ठाण्यातील शस्त्र लुटणे , निझामाचा महसुल लुटणे ,रझाकारावर जरब बसविणे अशी हिम्मत तरुण दाखवायला लागले. दत्तोबाची दहशत सर्वदूर पसरली .त्यांना पकडण्यासाठी मोठे इनाम ठेवण्यात आले होते पण ते सापडले नाहीत .उस्मानाबादचे तत्कालीन कलेक्टर महंमद हैदर यांच्या ऑक्टोबर कूप या नावाच्या पुस्तकात दत्तोबा भोसले यांची दहशत किती होती हे पाहायला मिळतं.हैद्राबाद मुक्ती लढ्याच्या अमृतमहोत्सवानिम्मित या महान योद्ध्याच्या कार्याची आठवण करुन तरुण मुलामध्ये आरोग्याची शिक्षणाची देशभक्तीची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे .”
यावेळी मातोळा ग्रामस्त आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला .
टिप्पणी पोस्ट करा