तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या खेळाडूंचे यश

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या खेळाडूंचे यश
मुरुम प्रतिनिधी :  कुन्हाळी, ता. उमरगा येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा  पडल्या. या स्पर्धेत भुसणी शाळेतील तीन खेळाडूंनी यश संपादन केले. यामध्ये आकाश सोनटक्के ४५ किलो गटांमध्ये प्रथम, प्रज्वल गावडे ६५ किलो गटांमध्ये प्रथम, तुकाराम सोनटक्के ५७ किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या खेळाडूंचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, संस्थेचे सचिव  व्यंकटराव जाधव गुरुजी, प्रशालेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे, क्रीडा शिक्षक महिंद्र गायकवाड व सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने