तृणधान्य खावून बालकांनी निरोगी रहावे-दयानंद स्वामी

तृणधान्य खावून बालकांनी निरोगी रहावे-दयानंद स्वामी

औसा - आपल्या दैनंदिन आहारात जास्तीत जास्त तृणधान्य सेवन केल्यास माणूस निरोगी राहतो . त्यामुळे बालकांनी तृणधान्यावर भर देवून आपले शरीर निरोगी ठेवावे असा संदेश मंडल कृषी अधिकारी दयानंद 
स्वामी यांनी दिला. ते औसा येथील श्री विरभद्रेश्वर प्रशालेत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुशंगाने आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. 
      महाराष्ट्र शासनाच्या निर्देशित केलेल्या दि. 1ते 14ऑगस्ट 2023 या दरम्यान प्रत्तेक शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 साजरे करून तृणधान्याचे महत्त्व सांगण्यासंदर्भात सूचित केले आहे. त्या प्रित्यर्थ श्री विरभद्रेश्वर प्रशाला,औसा येथे आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडल कृषी अधिकारी दयानंद स्वामी , कृषी सहाय्यक कंदले ए. पी., शाळेतील शिक्षक चंद्रशेखर हलमडगे, सदाशिव कांबळे, विश्वनाथ केवळराम , शिवाजी वैद्य , श्रीम.शोभा सिध्दपवार, श्रीम.प्रीती कांबळे , श्रीम.सुरेखा मुंजाने , श्रीम. अनुराधा लोहारे , दिगंबर शालगर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी स्वामी बोलताना म्हणाले कि, तृणधान्याचा वापर कमी होत चालल्याने आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुलांनी वडापाव , पीज्जा, बर्गर यांना बाजूला सारून जेवण्यासाठी तृणधान्याची पसंती द्यावी , त्यामुळे आरोग्य चांगले राहील असे आवाहन केले. यावेळी कृषी सहाय्यक कंदले यांनी तृणधान्य उत्पादनामुळे शेतजमीनीवर कसलाही विपरीत परीणाम होत नसून उलट जसे माणसाला तृणधान्य पोषक आहे तसे गुरांनाही सकस चारा मिळतो. आपण शेतकऱ्यांची मुले आहोत ही माहीती आपल्या पालकांनाही सागावे असे आवाहन कंदले यांनी मुलांना केले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक मुरगे यांनी तर आभार केवळराम यांनी मानले. या कार्यक्रमास उपस्थितांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचै प्रास्ताविक हलमडगे यांनी तर सुत्रसंचलन कांबळे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने