भादा -औसा तालुक्यातील भादा येथे महसूल मंडळ भादा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत महाराजस्व अभियान 2023 महसूल सप्ताह अंतर्गत दि 4/8/2023 रोजी फेरफार आदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंडळ अधिकारी श्रीमती स्वाती प्रल्हाद वाघे यांनी फेरफार आदलतीचे आयोजन करून भादा मंडळातील 28 फेरफार मंजूर करून लाभार्थींना यांना सातबारा व आठ अ वाटप करणायत आले. तसेच महसूल विभागाच्या सलोखा योजनेची माहिती देऊन जनजागृती करण्यात आले.महसूल विभागाच्या सलोखा योजने अंतर्गत तीन लाभार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महसूल मंडळ भादा अंतर्गत गावातील संजय गांधी योजनेने लाभार्थी यांचे प्रलंबित अर्ज निकाली काढले.
या मंडळातील भादा ,उटी बु.,समदर्गा ,बोरगाव न. ,नाव्होली ,भेटा ,आलमला ,येथील तलाठी यांनी गावातच रहिवासी ,उत्पन्न ,जातीचे प्रमाणपत्र यांचे वाटप केले.
या कार्यक्रमास भादा गावातील तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यकांत पाटील ,ग्रा.प. सदस्य तानाजी गायकवाड ,योगेश लटूरे ,सत्यशीला बनसोडे ,तसेच गावातील नागरिक पापु पठाण ,महादेव पाटील ,सतीश कात्रे ,पांडुरंग बनसोडे ,योगेश शिवलकर ,रुपसेन डोलारे, काळमाथा येथील पोलिस पाटील हरिभाऊ पाटील तसेच भादा मंडळातील शेतकरी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमास मंडळ अधिकारी स्वाती वाघे ,तसेच तलाठी राम दुधभाते ,बी.जी.सोनवते ,वाय.जे.मिश्रा ,श्रीमती ए.व्ही. जोगदंड ,चित्ते एस.डी,सुजाता राठोड कोतवाल लोंढे उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा