सर्व कर भरणा करणा-या मालमत्ता धारकांस चालू अर्थिक वर्षातील मालमत्ता,करात सुट

सर्व कर भरणा करणा-या मालमत्ता धारकांस चालू अर्थिक वर्षातील मालमत्ता,करात सुट
 लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्‍ताधारकांना कळविण्‍यात येते की,महाराष्‍ट्र  महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५१ अन्‍वये सुट देण्‍याचे अधिकार असून ३० सप्‍टेंबर २०२३ पर्यत सर्व कराचा भरणा करणा-या मालमत्‍ताधारकांस चालू अर्थिक वर्षातील फक्‍त मालमत्‍ताकरामध्‍ये (सामान्‍यकरामध्‍ये) ३ % सुट देण्‍यात येत आहे.तरी उक्‍त देण्‍यात आलेल्‍या सुटचा लाभ घेवुन मालमत्‍ताधारकांनी आपल्‍याकडील देय असलेल्‍या कराचा भरणा https:// propertytax.mclatur.in या वेबसाईटवर ऑन लाईन करावा.किंवा गुगल प्‍ले स्‍टोअर वर Latur property tax या ऑपवर करावा.किंवा Indian Bank Account No.7472770211 IFSC Code IDIB000L535 Branch Code No.6389 या खातेक्रमांकावर आरटीजीएस,युपीआय व डिबेटकार्ड या द्वारे किंवा आपणाकडे येणा-या वसूली लिपीकाकडे व जवळील क्षेत्रीय कार्यालयात भरणा करून वरील देण्‍यात आलेल्‍या योजनेचा लाभ घेवुन  लातूर शहर महानगरपालिकेस सहकार्य करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने