आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धत निवड झालेल्या सुषमा शिंदे राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या श्रावणी जगताप पि एस आय म्हणून निवड झालेल्या शीतल चील्ले यांचा जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धत निवड झालेल्या सुषमा शिंदे राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या श्रावणी जगताप पि एस आय म्हणून निवड झालेल्या शीतल चील्ले यांचा जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार
लातूर -लातूरची सुपुत्री श्रावणी राजेंद्र जगताप हिने अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या आक्वाट्रायथलोन व ट्रायथलोन या राज्यस्तरीय स्पर्धेत सायकलिंग धावणे पोहणे याचा समावेश असून सुवर्ण पदक पटकावून नेत्रदीपक कामगिरी केली त्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्रावणी जगताप ही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात कार्यरत असणारे सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांची कन्या आहे

*श्रावणी जगताप हिची अवघड स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी* 

 महाराष्ट्र ट्रायथलोन (Triathlon) असोसिएशन
आणि ठाणे ट्रायथलोन(Triathlon) यांच्या सयुक्त विद्यमाने ट्रायथलोन Triathlon) आणि आक्वाट्रायथलोन (Aquathlon) या खेळांचे राज्य स्थरीय स्पर्धांचे आयोजन डोंबिवली येथील ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर येथे १ ऑगस्ट आणि २ ऑगस्ट रोजी केले होते.
आक्वाट्रायथलोन (Aquathlon) आणि ट्रायथलोन (Triathlon) अत्यंत अवघड स्पर्धा समजल्या जातात, आक्वाट्रायथलोन (Aquathlon) स्पर्धेत पोहणे, धावणे तसेच ट्रायथलोन (Triathlon) या स्पर्धेत पोहणे , सायकलिंग, धावणे याचा समावेश आहे.

*दोन सुवर्ण पदक प्राप्त* 

 स्पर्धकांना साडेसातशे मीटर पोहणे संपताच त्वरित वीस किलोमीटर सायकलींग, पाच किलोमीटर धावणे कोणतीही विश्रांती न घेताच स्पर्धा पार करावी लागते.
या स्पर्धेत संपुर्ण राज्यातून शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत प्रथम विजयी स्पर्धक
राष्ट्रीय खेळ स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरतात. काल दुपारी चार वाजता या सर्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या, या स्पर्धेत दोनहि खेळात अठरा वर्षे खालच्या वयोगटात लातूरची कन्या श्रावणी राजेंद्र जगताप ने सुरेख कामगीरी करत स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकावले आहे. श्रावणी राजेंद्र जगताप ने नेत्रदीपक कामगिरी करून मिळवलेल्या विजयाचे संपूर्ण लातूर जिल्हयात कौतुक होत आहे, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि पुढील स्पर्धेसाठी आमदार धीरज देशमुख यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

*एमपीएससी परीक्षा परीक्षेत यश मिळवलेल्या पि एस आय चिल्ले हीचा सत्कार*

जिल्हा बँकेचे गटसचीव म्हणून लामजना येथे कार्यरत असणारे राजकुमार चिल्ले यांची कन्या शितल राजकुमार चिल्ले हीची नुकतीच एमपीएससी परीक्षा परीक्षेत यश मिळवून पि एस आय म्हणून नियुक्ती झाली आहे त्याबद्दल शितल चील्ले हीचा पुष्पगुच्छ देवून आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*एशियन गेम्स स्पर्धेत निवड झालेल्या सुषमा शिंदे यांचाही सन्मान*

लातूर तालुक्यातील टाकळगाव येथील कन्या असलेली सुषमा शिंदे हिने जिमनॅस्टिक खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडू म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल तिचा बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक राजकुमार पाटील संचालक अशोकराव गोविंदपुरकर संचालिका सौ सपना कीसवे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने