स्पर्धेत टिकायचे असेल तर वाचन करा - प्राचार्य डॉ. लहाने
जळकोट/प्रतिनिधी -
आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना स्वतःची प्रगती आणि उन्नती करावयाची असेल तर काळाबरोबर चालून स्पर्धेत आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी वाचन करा विविध अंगी वाचन साहित्यांचा छंद जोपासून एकाग्रतेने वाचन करा असा संदेश भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जयंती निमित्त आयोजित दोन दिवशीय भव्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यकक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ बी. टी लहाने बोलत होते.
संभाजीराव केंद्रे महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित दोनदिवसीय भव्य ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी टी लहाने , ग्रंथपाल डॉ. नामदेव राठोड , ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ . संदिपान मुंडे ,डॉ. घटकर डी टी हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. कलुरकर विजयकुमार आदी मान्यवरांच्या हस्ते भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ लहाने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड वाचन करून अभ्यास करून विद्यवतेच्या जोरावर भारतीय राज्यघटनेने शिल्पकार झाले. पुढे चालुन डॉ आंबेडकर जगमान्य विद्यवान म्हणूण नावारूपाला आले
केवळ आणि केवळ प्रचंड वाचनामुळेच विद्वान म्हणूण सर्वमान्य झाले असे बोलताना मत व्यक्त केले .
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल डॉ. नामदेव राठोड यांनी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पदमश्री डॉ. एस आर रंगनाथन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांनी भारतीय ग्रंथालय शास्त्रात दिलेले योगदान आणि कार्य यांचा सविस्तर उहापोह उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी ग्रंथालय विभागांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध अंगी वाचन साहित्याची ओळख व्हावी म्हणून दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून , यात कथा ,कादंबरी , निवडक लेख , विनोदी लेखसंग्रह , संदर्भ ग्रंथ, कविता , नाटके, संशोधन पर लेख नियतकालिके संशोधन नियतकालिके वर्तमानपत्रातील लेख आदी वाचन साहित्य ग्रंथ प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आले होते .या ग्रंथ प्रदर्शनिच्या माध्यमातून वाचकांच्या बुद्धीचा विकास होत असतो आणि जगातील नवनवीन अद्यावत माहिती साहित्यातून वर्तमानपत्र नियतकालिकातून वाचकास वाचावयास मेजवानी मिळत असते .
प्राचार्य डॉ.बी.टी. लहाने., उपप्राचार्य प्रा डॉ पाटील व्हि. आय.,
प्रा. डॉ पस्तापुरे आर एन.
प्रा. डॉ.जायेवार जे .एल. , प्रा.डॉ.नामदेव राठोड, प्रा. प्रा.डॉ . मुंडकर एस.एम ., कांबळे पी.एस., प्रा.डॉ. बालाजी राठोड, प्रा डॉ. कुडकेकर एन.पी., प्रा.डॉ. कांबळे माधव.,प्रा. डॉ. क्रिडा संचालक प्रा. डॉ.केंद्रे टी.ई., प्रा.डॉ .सौमवशी ए .बी. , प्रा.डॉ. शेळके जे .पी. , प्रा.डॉ. जोशी ए.जी., प्रा. कुलकर्णी महेश, प्रा. मोरे एस.एन., प्रा.डॉ.कल्लूरकर व्हि. टि., डॉ. टिमकीकर डी.एस. प्रा.डॉ. बिरादार आर .जी. ,प्रा. मुसळे एन.पी., प्रा. कांबळे पी.एस .,प्रा.डॉ. मुंडे अशोक , प्रा.डॉ. घटकार डी.टी., प्रा.केंद्रे के.के.., प्रा डॉ मुंडे एस. डी., प्रा.वडजे बी.एस., प्रा.बचूटे बी.एस., प्रा. नप्ते एस.यू., प्रा. कोरे एस.यू., प्रा. दापकेकर संतोष, प्रा सानप , प्रा सुरनर , प्रा.केंद्रा के.के., प्रा. शिदे , प्रा. देशपांडे मॅडम प्रा पाटील आदी कर्मचारीसह मोठ्या विध्यार्थी संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विजयकुमार कल्लूरकर यांनी केले तर आभार प्रा बापूसाहेब वडजे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा