लक्ष्मी अर्बन बँकेने मराठवाड्यात नावलौकिक मिळवला-माजी आ. वैजनाथराव शिंदे यांचे गौरवोदगार..

लक्ष्मी अर्बन बँकेने मराठवाड्यात नावलौकिक मिळवला-माजी आ. वैजनाथराव शिंदे यांचे गौरवोदगार..
बँकेच्या मोबाईल बँकिंग,एटीएम, युपीआय, क्युआर कोड व आयएमपीएस सुविधांचा शुभारंभ व ग्राहक मिळावा. 

लातूर/प्रतिनिधी - लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर या बँकेच्यावतीने डिजीटल बँकिंग सुविधांचा शुभारंभ व ग्राहक मेळावा दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी अग्रसेन भवन, लातूर येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वैजनाथराव (दादा) शिंदे हे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते बँकेच्या डिजीटल बँकिंग सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल कौतुक केले, मराठवाड्यातील सहकारी बँकामधील सर्वात आधुनिक बँक म्हणुन लक्ष्मी अर्बन बँकेकडे पाहिले जाते,असे ते म्हणाले. बँकेने मागील २५ वर्षात हजारो व्यापारी व सर्वसामान्यांना अर्थिक साहाय्य करुन अनेक उद्योजक निर्माण केले आहेत. विविध क्षेत्रातील तज्ञ व नामांकित व्यक्ती यांचा समावेश असलेले असे बँकेचे संचालक मंडळ असल्याने बँकेने हि यशस्वी वाटचाल केली असल्याचे मनोगत श्री. शिंदे यांनी व्यक्त करून संचालक व सर्व कर्मचारी वर्गांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस दीपप्रज्वलन व लक्ष्मीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन श्री अशोकजी अग्रवाल हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना त्यांनी लक्ष्मी अर्बन बँक हि संपूर्ण डिजीटल बँकिंग सेवा सुरू करणारी जिल्ह्यातील पहिली बँक असल्याचे त्यांनी सांगितले, काळाप्रमाणे बँकेने सेवेत बदल केला असून नवीन पिढीला लागणाऱ्या सर्व अधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत व पुढील काळात इंटरनेट बकिंग, फ्रॉकिंग, एसबीटीआर अशा सुविधा सुरू करण्याचा बँकेचा मानस असल्याचे श्री अग्रवाल यांनी सांगितले. 

बँकेच्या संचलिका सौ कमलादेवीजी राठी यांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशन लि; मुंबई यांच्याकडून संपूर्ण राज्यातून सन २०२२ चा श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. तसेच बँकेचे सभासद व ग्राहक श्री किशोरजी बिदादा यांना राष्ट्रीय स्तरावरील श्री महात्मा गांधी राष्ट्रीय अभिमान पुरस्कार 2023 भारत सरकार मिळाल्याबद्दल बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. 
योगायोगाने बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांचा वाढदिवस असल्याने अनेक व्यक्ती व संस्था प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षेनिमित्त आयोजित केलेल्या ग्राहक मेळाव्यास उपस्थित ग्राहकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. बँकेकडून मोबाईल बँकिंग अप्लिकेशन कसे वापरावे याबाबत बँकेचे आय. टी. विभागातील अधिकारी सुहास राजमाने व विठ्ठल वाघमारे यांनी मार्गदर्शन केले, ग्राहकांच्या प्रश्नांना बँकेचे चेअरमन यांनी उत्तरे दिली. यावेळी बँकेच्या काही ग्राहकांना प्राथमिक स्वरुपात एटीएम कार्ड व क्युआर कोडचे वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमास बँकेचे व्हा.चेअरमन सतिशजी भोसले, लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रल्हादजी दुडिले, उपाध्यक्ष किशोर बिदादा, बँकेचे संचालक धर्मवीरराव जाधव, सुरेशचंद्रजी जैन, लक्ष्मीकांतजी सोमाणी, अजितलालजी आळंदकर, विजयजी वर्मा, गणेशजी हेडडा, आशिषजी अग्रवाल, संचालिका सौ कमलादेवीजी राठी, सौ. रचनाजी ब्रिजवासी, सुवर्णा पवार, तज्ञ संचालक किशोरजी भराडिया, राजेशजीअग्रवाल, बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, विधिज्ञ सत्यनारायण तापडिया, संजय अग्रवाल, बाबासाहेब पाटील, सुरेश धानुरे, आबासाहेब देशमुख, फुलचंद देशमुख, नितीन कोरे, नंदकिशोर सारडा, चंद्रकांत पाटील, तुळशीराम गंभीरे, रविंद्र करजगे, विशाल अग्रवाल, अजय दुडिले, कैलास कांबळे, हरिकिशन तोष्णीवाल, दिलीप उस्तुरगे, सचिन पवार, गौरवी दुडिले,रेवती जोशी, शिवकुमार सांगवे, ई. ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बँकेचे अधिकारी हनुमानदास बांगड, प्रताप जाधव, अनिता कातपुरे, रविंद्र मदने, संतोष बनभेरू, सिद्धेश्वर पवार, दिनेश कांबळे, गौरव पल्लोड, शाखाधिकारी शिवकुमार राजमाने, अनुप सुवर्णकार ई. कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. बँकेचे व्हाईस चेअरमन सतिश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले तर बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुशिल जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने