‘राजमाता जिजामाता’त गुणवंतांचा गौरव
लातूर - येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजामाता विद्यालय, तुळजाभवानी विद्यालय व संगमेश्वर विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते ध्वजरोहण करुन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा के. ए. जायेभाये होत्या. यावेळी प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, मुख्याध्यापक स्वाती केंद्रे, समन्वयक वैशाली केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजीव मुंढे, राजेंद्र जायेभाये, प्रा. कविता केंद्रे, मदन धुमाळ, सुनीता जवळे, पांडुरंग कुलकर्णी, ए. बी. मुंडे, सुधाकर लोहकरे, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते, विष्णू कराड यांच्यासह अन्य प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या आठवणींचा कार्यक्रम सादर केला. यात बाल गटातील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर, भारत माता, अशा हुबेहूब वेशभूषा करून त्यांचे प्रसिध्द वाक्य त्यांच्या अविर्भावात म्हणून दाखविले. तसेच विद्यार्थ्यांनी चंद्रयान तीन या विषयावर आधारित एक सरप्राईज ऍक्ट सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संकुलातील विद्यार्थ्यांची वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूर - वीरांबद्दलची माहिती सांगून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा