कोकळगाव येथे नेत्र तपासणी व आरोग्य चिकित्सा शिबीर संपन्न
निलंगा/प्रतिनिधी- तालुक्यांतील कोकळगाव येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी व आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन लातूर शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे लातूर उप जिल्हा प्रमुख बजरंग दादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल कामले,उप तालुका प्रमुख अर्जुन नेलवाडे, युवा सेना उप तालुका प्रमुख महादेव जाधव, संजय पाटील, प्रभाकर जाधव, पाशासाब जागीरदार, अजय जाधव,संजय उजने, गोविंद गोडबोले, पंडित जाधव, नागनाथ बाबळसुरे, मधुकर जाधव, महेश वागांन्ना, फुलचंद कामले , रतन मनाळे, रानबा कामले तसेच सरवडी, नदी हत्तरगा आदी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी 180 रुग्णाची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करून,औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मानवी जीवनात आरोग्यास खूप महत्त्व आहे.आरोग्य हीच धनसंपदा आहे.म्हणूनच समाजातील नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असणारी गोरगरीब सामान्य जनतेच्या न्यायाला धावणारी शिवसेना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सेवाभाव ठेवून शिवसेना ही आपल्या गावामध्ये आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरीब वृद्ध सामान्य जनता शेतकरी कष्टकरी यानी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उप जिल्हा प्रमुख बजरंग दादा यांनी केले आहे. तालुक्यांतील इतर गावामध्ये सुध्दा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.गावागावांतील प्रत्येक गरजू नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा