माऊलीत स्वातंत्र्य सेनानींच्या आठवणी


माऊलीत स्वातंत्र्य सेनानींच्या आठवणी
लातूर/प्रतिनिधी-येथील अंबेजोगाई रोडवरील माऊली विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी माऊली बालक मंदिर च्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या आठवणी हा कार्यक्रम सादर केला. यामध्ये बाल गटातील विद्यार्थ्यांनी झाशीची राणी, सावित्रीबाई फुले,रवींद्रनाथ टागोर ,भारत माता ,अशा हुबेहूब वेशभूषा करून त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या अविर्भावात म्हणून दाखविले. तसेच माऊली विद्यार्थी विकास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान तीन या विषयावर आधारित एक सरप्राईज अँक्ट सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण विद्यालयाच्या प्राचार्या सौ कविता आरडले मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव श्री गंगाधर आरडले सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमात सन २०२२-२३ इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे मान्यवरांच्या हस्ते माऊली भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्या काळे भाग्यश्री, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक सुवर्णकार पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उबाळे भाग्यश्री यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक गोपाळ करडिले व सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने