ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमा अंतर्गत सातव्या सत्रातील कृषी दूतांनी अवलकोंडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ग्रामीण  कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमा अंतर्गत सातव्या सत्रातील कृषी दूतांनी अवलकोंडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कृषी महाविदयालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमा अंतर्गत सातव्या सत्रातील कृषी दूतांनी मौजे अवलकोंडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. त्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवर्धक व आरोग्यदायी पाणी बॉटल आणि खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महाराज मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच राहुल कांबळे, उपसरपंच विपुल सुडे, ग्रामसेवक घंटेवाड एम.बी.,माजी सरपंच व्यंकटराव पाटील, स.शि. श्रीमती सताळे, स.शि.श्रीमती तांबोळी व जाधव उपस्थित होते. सर्वप्रथम व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. कृषी महाविद्यालयाच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविकात स.शि. श्रीमती जाधव यांनी सांगितले की स्वच्छ पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे अनेकांना विविध रोगराईतून जाव लागतं आणि हे नक्कीच कमी होईल आणि शाळेच्या मैदानात वृक्षारोपण केल्यामुळे कृषी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनीही आभार मानले. या कार्यक्रमात जि.प. शाळेतील शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,अवलकोंडा येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सुर्यवंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिपाली कोकाटे व कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत राठोड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन अनिकेत चामले, प्रथमेश देशमाने,दिग्विजय चव्हाण,निखिल चव्हाण,जयराज देशमुख,प्रृथ्वीराज देशमुख,किरण बोये,प्रताप बिरादार,व कृष्णा दळवे या कृषीदितांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने