सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृह 

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        लातूरजिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुलांची 13 व मुलीचे 12 अशी एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पध्दतीने सुरु झाली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी http://www.hostel.mahasamajkalyan.in या लिंकचा वापर करून केवळ व्यावसायिक अभ्यासक्रम व आयटीआय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रकरिक्त जागेचा तपशिलप्रवेशासाठी नियमअटी व शर्ती यांची माहिती घेवून 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज भरु शकतील.

प्रवेश अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात व्यावसायिक अभ्यासक्रम व आयटीआय अभ्यासक्रमाचे पदवीपदविका प्रथम वर्षात, पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. महाविद्यलयाकडून थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज भरता येईल. व्यावसायिक व आयटीआय अभ्यासक्रमासाठी अर्ज करावयाची मुदत 20 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. तरी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक व्यावसायिक व आयटीआय अभ्यसक्रमाच्या विद्यार्थ्यांनी http://www.hostel.mahasamajkalyan.in लिंकचा वापर करून तसेच स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याशी संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त  एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने