शेतकऱ्यांना २५ टक्के आग्रीम रक्कम वितरीत करा :- खासदार सुधाकर शृंगारे

शेतकऱ्यांना २५ टक्के आग्रीम रक्कम वितरीत करा :- खा.सुधाकर शृंगारे


             लातूर-गेल्या १ महिन्यापासून जिल्हाभरामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणत खंड दिलेला असून ऐन जोमात आलेली आणि फुलोऱ्यात आलेली सोयाबीनचे पिके माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशी परिस्थिती आज जिल्हाभामध्ये निर्माण झालेली असल्याने शासन निर्णयानुसार २५ टक्के आग्रीम (आगाऊ) विम्याची रक्कम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट वितरीत करण्याबाबत आपल्यास्तरावरून संबंधितांना सूचना प्रदान करून निर्देश द्यावेत अशी विनंती आज लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.सुधाकर जी शृंगारे यांच्यासह लातूर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.दिलीपराव मालक देशमुख आणि लातूर शहर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.देविदास जी काळे यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांना केली. याप्रसंगी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरभाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव मालक देशमुखभाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळेदिग्विजय काथवटेवसंत डीगोळे,तुकाराम मद्देप्रकाश देशमुखरामकृष्ण कोतलापुरेसंजय गिरी, रवी सुडे, नितीन रेड्डीप्रताप पाटील, परमेश्र्वर पाटीलश्रीकांत देशमुखरणजित मिरकलेअंकुश जनवाडेदत्तात्रय जमालपुरेकाशीनाथ स्वामीदिलीप येनगेसाई हिप्पाळेरमेश पाटीलमहारुद्र होळदांडगे  यांच्यासह लातूर भाजपा चे पदाधिकारीनागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

            जिल्हाभरामध्ये गेल्या १ महिन्यापासून पावसाने खंड दिलेला असल्याने सर्वच पिके पावसाअभावी वाळत आहेत त्यामुळे महसूल विभागाने तत्काळ शेतीपिकांचे पंचनामे करून २५ टक्के विम्याची अग्रिम संरक्षित (आगाऊ) रक्कम देण्याबाबतची अधिसूचना विमा कंपनीस निर्गमित करण्याबाबतची विनंती भारतीय जनता पार्टी लातूर च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांना केळी.

            सोयाबीनचे पीक अगदी फुलोऱ्यात येत असतानाच पूर्ण जिल्हाभरामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणत खंड पडलेला असून सोयाबीनच्या संभाव्य उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता आज पूर्ण जिल्हाभरामध्ये निर्माण झालेली आहे. शासन निर्णयानुसार एकूण घट ५० टक्के पेक्षा अधिक असल्यास एकूण अंदाजित पीकविमा रकमेच्या २५ टक्के अग्रिम (आगाऊ) रक्कम शेतकऱ्यांना देण्याची तरतूद असून त्या तरतुदीच्या अनुषंगाने २५ टक्के आग्रीम (आगाऊ) रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत आपण तत्काळ विमा कंपनीस सूचना कराव्यात आणि पुढील काळामध्ये जर पावसाचा खंड असाच राहिला तर महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे काटेकोरपने पंचनामे करून एकही पात्र शेतकरी मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावीअशी विनंती लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूर च्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांना केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने