प्राचीन व आधुनिकतेचा सुरेख संगम म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-डॉ. सतिश शेळके

प्राचीन व आधुनिकतेचा सुरेख संगम म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-डॉ. सतिश शेळके

मुरुम-: शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन झाल्याशिवाय २१ व्या शतकात भारत जगात महासत्ता बनणार नाही. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्राचीन आणि आधुनिकतेचा सुरेख संगम म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होय असे प्रतिपादन श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सतिश शेळके यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी निमित्ताने आयोजित सांस्कृतिक सभागृहात पहिल्या सत्रातील व्याख्यानाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सतिश शेळके बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी जिल्हा समितीचे सदस्य प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. मुकुंद धुळेकर, एनएपीचे समन्वयक डॉ. सुशील मठपती, डॉ. सुजित मटकरी, डॉ. शिला स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. शेळके म्हणाले की, एका बाजूला आपली शिक्षण व्यवस्था भारताच्या प्राचीन परंपरांची जोपासना करते तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपारिक ज्ञान आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान याच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शेवटी ते म्हणाले. दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मुकुंद धुळेकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध संधी उपलब्ध करून देणारे आहे. गुरुकुल शिक्षण पध्दतीपासून ते सध्याच्या शिक्षण प्रणालीपर्यंत विचार केल्यास नवीन शैक्षणिक धोरण निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन आणणार असल्याचे शेवटी ते म्हणाले. यावेळी डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिला स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुशील मठपती तर आभार डॉ. सुजित मटकरी यांनी मानले. डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. राम बजगिरे, प्रा. नाना बेंडकाळे, प्रा.अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने