निराधार व रोहयोच्या कमिटीत राष्ट्रवादी पक्षाच्या विसर..!

निराधार व रोहयोच्या कमिटीत राष्ट्रवादी पक्षाच्या विसर..!
राष्ट्रवादीच्या प्रस्तावीत विकास कामाना ठेंगा..!
औसा-तालुकास्तरावर  विविध समित्या गठित  केल्या जातात यात अशासकीय सदस्य म्हणून निवड केली जाते.
संजय गांधी निराधार योजना, रोजगार हमी योजना या समीतीवर सर्व सदस्यांची निवड ही 
 भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून करण्यात आली असून सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचे बॅनर झडकत आहेत.यामध्ये राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटास संपूर्णपणे डावलण्यात आले आहे.औसा शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी यांना या दोन्ही कमिटीत घेण्यात आले नाही असा आरोप राष्ट्रवादीचे  पदाधिकारी  मेहराज शेख व आनंद बनसोडे यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणुन अजित दादा पवार यांनी दि 2 जुलै रोजी शपथ घेतली व 40 आमदारासह सत्तेत सहभागी झाले.त्यानंतर अती घाईघाईत, लातुरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक 18 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी लातूर यांना पत्र काढुन वरील औसा शहर व तालुक्यातील तिन्ही समितीवर सदस्य व अध्यक्ष म्हणुन नावे कळवली आहेत आणि विशेष म्हणजे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी 2जुलै रोजी शपथ घेउन सत्तेत सामील झाल्यानंतर समितीची रचना व नेमणुका ह्या जाहीर करण्यात आल्या आहेत.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास कुठेही स्थान देण्यात आलेले नाही.
तसेच दिनांक 13 ऑगस्ट रोजी येथील आझाद चौक परिसरामध्ये आ. अभिमन्यू पवार यांनी जाहीर सभा घेऊन माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी यांच्यावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आणि शहरातील मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचे ही याप्रसंगी जाहीर केले होते.
यापूर्वी महाविकास आघाडी सत्तेत असताना संजय गांधी निराधार योजना समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कार्यरत होते व विविध तहसील कार्यालय अथवा इतर समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक सदस्य यांना सामावून घेण्यात आलेले होते. त्यांना त्यांचा वाटा देण्यात आलेला होता परंतु आता महायुती सहभागी असूनही या कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही पदाधिका-याला कमिटीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली नाही.
नगरपालिका व पंचायत समितीच्या विकास कामात राष्ट्रवादीकडून एकाही कामाची शिफारस घेतली जात नाही- राहुल मलवाड
औसा नगर परिषदेच्या विविध विकास कामांमध्ये तसेच पंचायत समितीकडून होणाऱ्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या माजी नगरसेवक अथवा माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सूचना किंवा शिफारशी विचारात घेतल्या जात नाहीत.तसेच आज रोजी पर्यंत एकही काम प्रस्तावित करण्यात आलेले नाही.यासंबंधी आम्ही संबंधित कार्यालयांना लेखी कळवून कामे प्रस्तावित केलेली आहे परंतु याची आज रोजी पर्यंत दखल घेतली गेलेली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने