रॉबिनहूड क्रांतिवीर दत्तोबा भोसले-प्रा.नयन राजमाने

रॉबिनहूड क्रांतिवीर दत्तोबा भोसले-प्रा.नयन राजमाने
लातूर/प्रतिनिधी - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवताळा ता. औसा, जि. लातूर अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष परिपूर्ती निमित्ताने "हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान" याचे आयोजन आज दि.१९/०८/२०२३ रोजी श्री.शिवाजी विद्यालय, लातूर येथे प्रा. नयन भादुले-राजमाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. मंचावर मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संग्राम बावगे सर, व्याख्यात्या प्रा. नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन', लातूर, श्री. उमाकांत जाधव सर, समन्वयक श्री. अशोक तोगरे सर,रणशेट्टे मॅडम, तोगरे मॅडम इ. उपस्थित होते. 
            कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक रणशेट्टे मॅडम यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल देऊन मु.अ.संग्राम बावगे यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यात्या प्रा नयन भादुले- राजमाने यांनी आपल्या व्याख्यानातून क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या कार्याची थोरवी स्पष्ट केली.त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास किती संघर्षमय आहे, हे आपल्या तेजस्वी भाषणातून स्पष्ट केले,या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत व टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संग्राम बावगे यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. उमाकांत जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने