गायकवाड यांच्या वतीने रोहयोचे सदस्य व गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार

गायकवाड यांच्या वतीने  रोहयोचे सदस्य व गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार
आलमला/प्रतिनिधी - श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे विद्यालयाच्या प्रांगणात सेवानिवृत्त शिक्षक मनोहर गायकवाड यांच्या वतीने आलमला गावातील विविध मान्यवराचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच गुंडाप्प लांडगे, तर प्रमुख पाहूणे म्हणून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वीरभद्र बेरुळे हे उपस्थित होते. 
     या कार्यक्रमांमध्ये रामनाथ विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक मनोहर गायकवाड  यांनी सर्व प्रथम रामनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. एस. एस. पाटील यांना अभिवादन करून, सध्या संस्थेचे अध्यक्ष ॲड. उमेश पाटील, सचिव प्रभाकर कापसे व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्याबदल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये डॉ. कैलास प्रभाकर कापसे यांनी फार्मसी विषयात पीएचडी प्रदान झाल्याबद्दल, दौलत वाघमारे यांची औसा तालुका रोजगार हमी समितीवर नियुक्ती झाल्या बदल् तसेच जिल्हा परिषद शाळेतील विधार्थी यांनी जिल्हास्तरीय मार्शल आर्ट कराटे स्पर्धामधे यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थी खंगले वेदांत महेश, स्वामी सोहम राजकुमार, चैतन्य संजय कदम, यशराज विजयकुमार आणि उपस्थित मान्यवर शालेय समिति अध्यक्ष प्रवीण जगदाळे, संजय कदम यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल सूर्यकांत जाधव, अण्णासाहेब गायकवाड, राजकुमार धाराशिवे, खलील मुलाणी,महादेव मगर, राजकुमार स्वामी, सीताराम पवार आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने